Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Kalote Dam : खालापुरातील कलोते धरणात अतिक्रमण

Team Agrowon

Khalapur Dam : खालापूर तालुक्यातील सिंचनासाठी असलेल्‍या कलोते धरणात काही दिवसांपासून अतिक्रमण वाढले आहेत. धनिकांकडून याठिकाणी बांधकाम करण्यात येत असून काही ठिकाणी व्यावसायिक वापर करण्यात येत आहे. त्‍यामुळे स्‍थानिकांमध्ये नाराजी व्यक्‍त होत आहे.

तालुक्यातील सिंचनाची गरज ओळखून १९७६ मध्‍ये ते बांधण्यात आले. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरून अवघ्या दोन किमी अंतरावर धरण आहे. निसर्गाच्या सानिध्यात, निवांत ठिकाण असल्‍याने धनिकांनी जागा घेतल्‍या आहेत.

वीकेण्ड अथवा सुटीच्या कालावधीत पर्यटकांना फार्महाऊस भाड्याने दिले जात असून बोटिंगची सोय करण्यात आली आहे. पाटंबधारे विभागाकडे याप्रकरणी अनेकदा तक्रारी केल्‍याचे स्‍थानिकांकडून सांगण्यात येेत आहे.

अतिक्रमण करणाऱ्यांना नोटिसा

धरणपात्राची मोजणी करण्यात आली होती. माथा पातळी तपासली असता धरणात अतिक्रमण झाल्याचे समोर आले आहे.

अतिक्रमण करणाऱ्यांना नोटिसा पाठवण्यात आल्‍या आहेत, मात्र कारवाई होत नसल्‍याने बांधकामे वाढत आहेत.

धरणपात्रात पर्यटकांचा मृत्यू झाल्‍याची घटना घडूनही अद्याप ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही.

धरणपात्रातील अतिक्रमणाबाबत मुख्य कार्यालय कोलाड येथे वरिष्ठ अधिकारी यांना माहिती दिली आहे. धरण पात्रात बेकायदेशीरपणे बोटिंगबाबत लवकरच कारवाई करण्यात येईल.
भरत गुंटूरकर, उपमुख्य अभियंता, पाटबंधारे विभाग, कर्जत

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT