Women Empowerment Agrowon
ॲग्रो विशेष

Women Empowerment : ‘तिच्या’ संघर्षाने महिलांमध्ये निर्माण झाली प्रेरणा

Women Farmer : शेतीत संकटांना कंटाळून काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तर शेतकरी कुटुंबातील कर्ते पुरुष आजारपण, अपघातात प्रपंच अर्ध्यावर सोडून निघून गेले. अशावेळी जबाबदारी महिलांवर पडते.

Team Agrowon

Nashik News : शेतीत संकटांना कंटाळून काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तर शेतकरी कुटुंबातील कर्ते पुरुष आजारपण, अपघातात प्रपंच अर्ध्यावर सोडून निघून गेले. अशावेळी जबाबदारी महिलांवर पडते.या प्रतिकूल परिस्थितीत अंधारलेल्या वाटेत जिद्दीने प्रकाश पेरणाऱ्या महिला आदर्श ठरतात.अशाच शेतीत किमया घडवणाऱ्या कर्तुत्वान तेजस्विनींचा सन्मान ‘युवामित्र’ संस्थेने महिला मेळाव्यात केला.

जागतिक महिला दिनानिमित्त लोणारवाडी(ता.सिन्नर) येथे युवामित्र संस्था, बजाज फायनान्स लि.,रंभा फिलांथ्रोपी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी(ता.२७ मार्च) रोजी ‘महिला मेळावा’ आयोजित करण्यात आला होता.

यावेळी कृषी क्षेत्रासह पशुपालनावर आधारित उपजीविका विकास आणि विविध उद्योगांमध्ये कर्तृत्व गाजवणाऱ्या नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील १२ महिलांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी दोन हजार महिलांनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती. कार्यक्रमास पशुसंवर्धन सहायक आयुक्त डॉ. संजय थोरात, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. ज्ञानदा जाधव, पशुधन विकास अधिकारी डॉ. योगेश दुबे, डॉ. अवंतिका उदगीरकर, डॉ. विकास चत्तर, रंभा फिलांथ्रोपी फाउंडेशनचे रणजित पुजारी, बिरुदेव चाणगिरे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा मित्रच्या कार्यकारी संचालिका मनीषा पोटे यांनी केले. त्या म्हणाल्या, की युवा मित्रच्या माध्यमातून शेळीपालनावर आधारित महिला उपजीविका विकास कार्यक्रम सिन्नर तालुक्यातील १०० गावांमध्ये आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर व राहता तालुक्यांतील ५५ गावांमध्ये सुरू आहे.

महिलांना शेळीपालनाचे तांत्रिक मार्गदर्शन मिळावे शेळी विक्री व्यवस्था निर्माण व्हावी आणि या व्यवसायातून अधिक नफा मिळावा, यासाठी सावित्रीबाई फुले शेळीपालन उत्पादक कंपनी स्थापन करण्यात करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

...यांचा झाला सन्मान

छाया जगताप, अनिता गिते, भारती रनमाळे, अनिता दिघे, सावित्रीबाई कोकाटे, शिलाताई सांगळे, संगीता पिंगळे, रत्नप्रभा वाघ, संगीता बोरस्ते, ताराबाई पडोळ, मनीषा भगत, वनिता बऱ्हे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज 

Farm Loan Waiver: कर्जमाफीबाबतच्या सरकारच्या निर्णयाचे स्वागत, पण नियमित कर्जदारांनाही दिलासा मिळावा- अजित नवले

Power Theft Cases: तीन महिन्यांत २८ हजार वीजचोऱ्या पकडल्या

Pending Works: प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : खासदार डॉ. कल्याण काळे

limate Change Hits Marine Fisheries : हवामान बदलामुळे मासेमारीचे दिवस घटले; सीएमएफआरआयच्या संचालकांनी दिली माहिती

SCROLL FOR NEXT