Goat Farming  Agrowon
ॲग्रो विशेष

Goat Farming : आत्महत्याग्रस्त कुटुंबाला दिला शेळीपालनातून रोजगार

Dhananjay Munde : आत्महत्याग्रस्त (कै.) मनोज राठोड यांच्या कुटुंबीयांना रोजगाराच्या दिलेल्या आश्‍वासनाची पूर्तता करीत कृषिमंत्री धनंजय मुुंडे यांच्या वतीने ९ शेळ्या व एक बोकुड येरद या गावी पोहोचविण्यात आला.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Yavatmal News : आत्महत्याग्रस्त (कै.) मनोज राठोड यांच्या कुटुंबीयांना रोजगाराच्या दिलेल्या आश्‍वासनाची पूर्तता करीत कृषिमंत्री धनंजय मुुंडे यांच्या वतीने ९ शेळ्या व एक बोकुड येरद या गावी पोहोचविण्यात आला.

या माध्यमातून रोजगाराचा पर्याय उपलब्ध झाल्याने आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांनी कृषिमंत्र्यांप्रती आभार व्यक्‍त केले आहेत. यवतमाळपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या येरद येथील मनोज राठोड यांनी १५ ऑगस्ट रोजी गळफास घेत आत्महत्या केली होती.

दरम्यान, १८ ऑगस्ट रोजी यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर असलेल्या कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मनोज यांची पत्नी व चार मुलींची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. त्यासोबतच या कुटुंबीयांच्या मागणीनुसार रोजगाराचे साधन देणार असल्याचे जाहीर केले होते.

त्यानुसार गुरुवारी (ता. २६) येरद या गावी शिलाई मशिन, पिको फॉल मशिन तसेच रोख मदत देण्यात आली. शुक्रवारी (ता. २७) पुन्हा याच कुटुंबीयांच्या मागणीनुसार त्यांना ९ शेळ्या व एक बोकुड याप्रमाणे घरपोच देण्यात आले.

शेतीपूरक शेळीपालनातून रोजगाराचा पर्याय उपलब्ध झाल्याने राठोड कुटुंबीयांनी कृषिमंत्र्यांप्रती आभार व्यक्‍त केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bajara Farming: बाजरीची पेरणी आणि खत व्यवस्थापन; चांगल्या उत्पादनासाठी महत्त्वाच्या गोष्टी

RBI MPC Meeting 2026: कर्जाचा हप्ता वाढणार नाही, पण कमी पावसामुळे महागाई वाढणार- आरबीआय गर्व्हनर

Modern Sowing Machines: पेरणीकरिता आधुनिक यंत्रांचा वापर

Crop Impact Management: विदर्भातील पर्जन्यमान अन् पिकांवरील परिणाम

Kharif Crop Planning: खरिपाच्या पूर्वतयारीसाठी हे मुद्दे नका विसरू

SCROLL FOR NEXT