Krishna River Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Alert : ‘कृष्णे’च्या पाणलोट क्षेत्रात जोर कायम

Rain Update : कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून, नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. आयर्विन पुलाजवळ पाणी पातळी ३२ फूट असून, त्यात वाढ सुरूच आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.

Team Agrowon

Sangli News : कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून, नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. आयर्विन पुलाजवळ पाणी पातळी ३२ फूट असून, त्यात वाढ सुरूच आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. महापालिका क्षेत्रातील पूर पट्ट्यातील लोकांचे स्थलांतर करण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यात थांबूनथांबून पाऊस सुरू आहे.

जिल्ह्यात बुधवारी (ता. २४) रात्रभर संततधार पाऊस झाला. गुरुवारी सकाळपासून पावसाने उघडीप दिली. चोवीस तासांत २०.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरण क्षेत्रात अतिवृष्टी होत असून नदीची पाणी पातळी वाढू लागली आहे.

सांगली महापालिका क्षेत्रातील सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट (शिवनगर), कर्नाळ रस्ता परिसर, शिवमंदिर परिसर बायपास चौक, काकानगर परिसरातील घरे, दत्तनगर परिसर हे भाग पूर पट्ट्यात आहेत. याभागात पाणीपातळी ३० फुटांपासून ते ३५ फुटांपर्यंत पोहोचल्यानंतर या भागात पाणी येते.

सध्या सूर्यवंशी प्लॉटमधील सात कुटुंबे असून त्यांची सोय शाळा क्रमांक ३ व १७ येथे केली आहे. निवारा केंद्रात १९ मोठी माणसे तर ७ लहान मुले अशी २६ सदस्य संख्या आहे. ३ कुटुंबे अन्य ठिकाणी स्थलांतरीत झाली आहेत. आरवाडे प्लॉटमधील ३ कुटुंबे स्थलांतरीत झाली आहेत. अन्य ठिकाणी ६ कुटुंबांतील ३० सदस्य आहेत. तर मिरजेतील कुरणे मळ्यातील ७० जनावरे सुरक्षितस्थळी हलविण्यात आली आहेत.

विविध ठिकाणी पाणीपातळी स्थिती

ठिकाण पाणी पातळी (फूट). इशारा पातळी फूट

कोयना पूल कऱ्हाड २८.३ ४५

कृष्णा पूल कऱ्हाड २२.०३ ४५

बहे पूल ११.०२ २१.९

ताकारी पूल ३५.०० ४४

भिलवडी पूल ३४.४ ५१

आयर्विन पूल सांगली ३२ ४०

अंकली पूल हरीपूर ३५.११ ४५.११

म्हैसाळ बंधारा ४४.८ ५२

राजाराम बंधारा कोल्हापूर ४३.०१ ३९

राजाराम बंधारा ४५.०९ ५३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT