Dr. Kailas Mote  Agrowon
ॲग्रो विशेष

Fruit Crop Research : हवामान बदलानुसार द्यावा फळ पीक संशोधनावर भर

Dr. Kailas Mote : 'हवामानातील बदलांमुळे फळ पिकांवर मोठा परिणाम दिसून येत आहे. त्या अनुषंगाने संशोधनावर भर द्यावा लागेल,’’ असे प्रतिपादन फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते यांनी केले.

Team Agrowon

Nagar News : ‘‘हवामानातील बदलांमुळे फळ पिकांवर मोठा परिणाम दिसून येत आहे. त्या अनुषंगाने संशोधनावर भर द्यावा लागेल,’’ असे प्रतिपादन फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते यांनी केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाची २५ वी कृषी संशोधन परिषदेची बैठक नुकतीच झाली. या वेळी फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते, राष्ट्रीय मृद विज्ञान व जमीन वापर नियोजन संस्थेचे संचालक डॉ. नितीन पाटील, संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. प्रकाश शिनगारे उपस्थित होते.

डॉ. मोते म्हणाले, ‘‘फळ पिकांची निर्यात वाढवण्यासाठी कीडमुक्त क्षेत्र घोषित करणे, रोग व कीडमुक्त रोपवाटिका विकसित करणे, निर्यातीचे मानक लक्षात घेऊन गुणवत्तापूर्ण कृषी उत्पादकता वाढवणे या बाबी निर्यात वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत. हायड्रोपोनिक्स व एरोपोनिक्स तंत्रज्ञानावर भर द्यावा लागेल.’’

विद्यापीठामध्ये वर्षभरात झालेल्या संशोधनाचे पुनरावलोकन करून मूल्यमापन करणे, संशोधनावर आधारित अधिकृत अहवाल, तंत्रज्ञानावर आधारित पत्रके, पुस्तके यांचे प्रकाशन करणे आणि संशोधनाची भविष्यकालीन दिशा ठरवणे या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी बैठक झाली.

डॉ. पाटील म्हणाले, ‘‘विविध पीक पद्धतींचा अवलंब ही शेतकऱ्यांची मागणी असून बदलत्या हवामानाच्या अनुषंगाने याबाबत विद्यापीठांमध्ये संशोधन सुरू आहे. येत्या काळात प्रत्येक क्षेत्रात यांत्रिकीकरणाची गरज आहे. शेतीत यांत्रिकीकरणाचा अवलंब करण्याला पर्याय नाही.’’

‘गट शेतीवर भर द्यावा लागेल’

‘‘कृषी विद्यापीठातील कृषीविषयक आधुनिक संशोधनाबरोबरच स्थानिक पिकांचे वाण संवर्धन करणे, शुद्धता जोपासणे आवश्यक आहे. इथून पुढे गट शेतीवर भर द्यावा लागेल. त्याचबरोबर विविध औषधी गुणधर्म असलेली भरडधान्य आरोग्यासाठी महत्त्वाची असल्याने त्याखालील क्षेत्र वाढवून संशोधन करावे लागेल,’’ असे डॉ. कुलगुरू पाटील यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT