Goat Rearing Agrowon
ॲग्रो विशेष

Goat Rearing Techniques : शेळीपालनात ऋतुनिहाय व्यवस्थापन तंत्र बदलावर भर

Goat Farming : प्रतीक एकनाथ साबे या तरूण शेतकऱ्याने मागील ४ वर्षांपूर्वी शेळीपालनास सुरुवात केली. आज त्यांच्याकडे सुमारे ८५ शेळ्या आहेत. हवामान बदलानुसार ऋतुनिहाय व्यवस्थापन तंत्रात बदल करत शेळीपालन व्यवसाय यशस्वी केला आहे.

 गोपाल हागे

Goat Farming Management :

शेतकरी नियोजन

शेळीपालन

शेतकरी : प्रतीक एकनाथ साबे

गाव : आडविहीर, ता. मोताळा, जि. बुलडाणा

एकूण शेळ्या : ८५

अनुभव : ४ वर्षे

प्रतीक एकनाथ साबे या तरूण शेतकऱ्याने मागील ४ वर्षांपूर्वी शेळीपालनास सुरुवात केली. आज त्यांच्याकडे सुमारे ८५ शेळ्या आहेत. हवामान बदलानुसार ऋतुनिहाय व्यवस्थापन तंत्रात बदल करत शेळीपालन व्यवसाय यशस्वी केला आहे. शेळीपालनात शेळ्यांची निवड, शेडची रचना, चारा नियोजन, पिलांचे संगोपन, आरोग्य व्यवस्थापन आणि विक्री व्यवस्थापन या सर्व बाबींचा परिपूर्ण अभ्यास त्यांनी केला आहे. येत्या काळात पावसाळ्याचा विचार करता शेळ्यांसाठी बंदिस्त स्वरुपाचे नियोजन करण्यावर सध्या भर दिला जात आहे.

शेळीपालनामध्येच गावरान कुक्कुटपालन आणि ससेपालन केले आहे. त्यातून उत्पन्नाचा आणखी स्त्रोत निर्माण झाला आहे. त्यामुळे शेळीफार्मला भेट देण्यास येणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये वाढ झाली आहे.

खाद्य व्यवस्थापन

या वर्षी शेळ्यांच्या संख्येत वाढ केली आहे. त्यामुळे शेळ्यांना लागणाऱ्या सुक्या चाऱ्याच्या प्रमाणात वाढ होणार आहे. सुका चारा साठवणुकीसाठी छोटे शेड उभारले आहे. शेळ्यांना लागणाऱ्या चाऱ्याची वाढती गरज पाहून चारा साठवणुकीच्या शेडचा विस्तार केला आहे.

पुढील साधारण ८ महिने पुरेल इतका सुका

चारा शेडमध्ये भरून ठेवला आहे.

त्यात सोयाबीनचे कुटार, तुरीचे कुटार, हरभऱ्याचे कुटार व मका कुट्टी यांचा समावेश आहे.

हिरव्या चाऱ्यासाठी शेतात मका, दशरथ घास, वेगवेगळे नेपीयर, सुबाभूळ, तुती, शेवगा यांची लागवड केली आहे. त्यानुसार लेंडीखत टाकून शेत तयार केले आहे.

दरवर्षी साधारण दीड एकरात चारा पिकांची

लागवड केली जात असे. त्यात यंदा अर्धा एकर क्षेत्राची वाढ केली आहे. आगामी काळातील शेळ्यांची हिरव्या चाऱ्याची गरज पाहून हा निर्णय घेतला आहे.

आरोग्य व्यवस्थापन

पावसाळ्यापूर्वी शेळ्यांना रोगप्रतिबंधात्मक लसीकरण केले जाईल. जंतनाशकाची मात्रा दिली आहे. पावसाळ्याच्या दिवसांत शेड जास्तीत जास्त कोरडे राखण्यावर भर दिला जाईल. पावसाचे पाणी शेडच्या आत येऊ नये म्हणून आवश्यक तिथे ताडपत्री लावली जाईल.

आगामी नियोजन

शेड कोरडे राखण्यासाठी पावसाळ्यापूर्वी शेडमध्ये आवश्यक तिथे मुरूम टाकला जाईल.

पावसाळ्यातील पाण्यापासून शेळ्यांना संरक्षणासाठी शेडमध्ये आवश्यक बदल केले जातील.

चारा कापणीसाठी नवीन कटर खरेदी करण्याचे नियोजित आहे.

कुट्टी केलेल्या चाऱ्यासाठी नवीन टीनशेड करायचे ठरविले आहे. त्यानुसार नियोजन सुरू आहे.

वेळापत्रकानुसार उर्वरित लसीकरणाची मात्रा शेळ्यांना दिल्या जातील.

जुन्या गव्हाणींची दुरुस्ती केली जाईल. तसेच नवीन गव्हाणी तयार करण्याचे नियोजन आहे.

लहान करडांसाठी स्वतंत्र वेगळे कप्पे व गव्हाणी तयार करणार आहे.

पावसाळ्यात शेळ्या विविध आजारांना बळी पडतात. त्यासाठी शेडवर आवश्यक औषधे उपलब्ध केली जातील. जेणेकरून लहान करडांना आणि शेळ्यांचे आरोग्य चांगले राहील.

पावसाळा हा शेळीपालन व्यवसायासाठी परीक्षेचा ऋतू ठरतो. कारण शेळ्यांना होणाऱ्या आजारांपैकी बहुतांश आजार हे पावसाळ्यात होतात. विशेषतः लहान करडांमध्ये मरतुक होण्याची शक्यता असते. त्यामुळे मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी व्यवस्थापन तंत्रात काटेकोर आणि आवश्यक बदल करणे अत्यंत आवश्यक असते.

प्रतीक साबे, ७३५०४७७२४२

(शब्दांकन : गोपाल हागे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Election Results 2024 : पोस्टल मतदानात कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातून पहिला कल हाती

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

SCROLL FOR NEXT