Bharati Prataprao Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Bharati Pawar : भारती पवार अनंतात विलीन

Bharati Pawar Demise : भारती प्रतापराव पवार मंगळवारी दुपारी अनंतात विलीन झाल्या. त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Team Agrowon

Pune News : भारती प्रतापराव पवार मंगळवारी दुपारी अनंतात विलीन झाल्या. त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी पवार कुटुंबीयांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या पत्नी आणि ‘सकाळ’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांच्या मातुःश्री भारती पवार यांचे सोमवारी (ता. १७) सायंकाळी पुण्यात निधन झाले.

मंगळवारी (ता. १८) सकाळी ९​ ते ११ या वेळेत बाणेर येथील निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. राजकीय, सामाजिक, उद्योग यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी येथे दर्शन घेतले. त्यानंतर दुपारी १२ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रतापराव पवार, पुत्र अभिजित पवार, कन्या आश्‍विनी, सून मृणाल पवार आणि कुटुंबीयांचे समाजातील विविध स्तरांतील लोकांनी सांत्वन केले. या वेळी पवार कुटुंबातील ज्येष्ठ शरद पवार तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, सदानंद सुळे, श्रीनिवास पवार, राजेंद्र पवार, रणजित पवार, जयंत पवार, विजया पाटील, डॉ. रजनी इंदूलकर, सरोज पाटील, शर्मिला पवार, सुनंदा पवार, रोहित पवार, युगेंद्र पवार, जय पवार, शुभांगी पवार, निकोलस पवार, जोनस पवार, दिलीप माने, जयश्री माने, जयदीप माने, यश पाटील, आशा पवार, रवी नातू, अलका नातू, संजीव पाटील, जगदीश कदम आदींनी साश्रूनयनांनी भारती पवार यांना अखेरचा निरोप दिला.

या प्रसंगी समाजाच्या विविध स्तरांतील मान्यवर, नागरिक उपस्थित होते. डॉ. बाबा आढाव, मंगलप्रभात लोढा, अभय फिरोदिया, सुमन किर्लोस्कर, सतीश मगर, विठ्ठल मणियार, सुनील व मालविका तांबे, हर्षवर्धन पाटील, डॉ. विश्‍वजित कदम, अशोक मोहोळ, उल्हास पवार, देविदास भन्साळी, मदन बाफना, विलास लांडे, अशोक पवार, मोहन जोशी, कमल ढोले पाटील, वालचंद संचेती, पोपटलाल ओस्तवाल, ॲड. एस. के. जैन, डॉ. राजेंद्र भोसले, प्रभाकर देशमुख, चंद्रकांत दळवी, दिलीप बंड, पोपटराव पवार, गजेंद्र पवार, हनुमंतराव गायकवाड, अमर मांजरेकर, प्रशांत गिरबने, मिलिंद कांबळे, अंकुश काकडे, कमल व्यवहारे, राजलक्ष्मी भोसले, मुक्ता दाभोलकर, श्रीमंत कोकाटे आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tractor GPS : ट्रॅक्टर ट्राल्यांना जीपीएस, ब्लॅक बॉक्स बसवण्याला विरोध

Ujani Dam Capacity : उजनी धरण १०० टक्के भरले

Reshim Sheti : ऐन चंणचणीच्या काळात रेशीमशेतीचा हातभार

New Mahabaleshwar Project : नवीन महाबळेश्‍वर प्रकल्पामुळे ‘सह्याद्री’चा धोका वाढणार

PDKV Akola : इन्स्टिट्यूशनल फेलो पुरस्काराने ‘पंदेकृवि’चा झाला सन्मान

SCROLL FOR NEXT