Agriculture Department Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Officers Protest: कृषी सेवा वर्ग दोन संवर्गावरील समकक्षतेचा अन्याय दूर करा

Warning of Protest: कृषी सेवा वर्ग २ (तालुका कृषी अधिकारी व तंत्र अधिकारी) संवर्गावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आंदोलनाची भूमिका घेतली असून, २१ मेपासून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

 गोपाल हागे

Akola News: कृषी विभागाचा सुधारित आकृतिबंध योग्य सुधारणांसह अंतिम करावा आणि महाराष्ट्र कृषी सेवा वर्ग दोन (तालुका कृषी अधिकारी, तंत्र अधिकारी) संवर्गावर समकक्षतेबाबत होणारा अन्याय दूर करावा, अशी मागणी महाराष्ट्र कृषिसेवा वर्ग २ राजपत्रित अधिकारी कल्याणकारी संघटनेने कृषी खात्याच्या अप्पर मुख्य सचिवांकडे केली आहे. तसेच बुधवार (ता. २१)पासून राज्यभरात आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.

या बाबत दिलेल्या निवेदनात म्हटले, की कृषी विभागाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्र कृषी सेवा वर्ग २ संवर्गाचा तालुकास्तरीय कार्यालय प्रमुख तसेच वरिष्ठ कार्यालयात तंत्र अधिकारी म्हणून मोलाचा वाटा आहे. वित्त विभागाने सर्व विभागांना ऑगस्ट २०१७ पर्यंत सुधारित आकृतिबंध सादर करण्याचे निर्देश दिले असताना पदोन्नतीच्या किमान दोन संधी देणारा व पिरॅमिडिक आकृतिबंध करण्याबाबत संवर्गाने वेळोवेळी निवेदने देऊन देखील कृषी विभाग सुमारे आठ वर्षांपासून आकृतिबंध अंतिम करू शकलेला नाही.

कृषी अभ्यासक्रम व्यावसायिक घोषित केल्यामुळे तसेच शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी अभियानात कृषी सेवा वर्ग दोन संवर्गाने महत्त्वपूर्ण योगदान पाहता विभागातील तांत्रिक संवर्गाची समकक्षता इतर विभागांतील तांत्रिक व्यावसायिक संवर्गाशी प्रस्थापित कण्याबाबत राज्य शासनास निर्देश प्राप्त झाले होते.

असे असताना विभागाने तांत्रिक संवर्गाची समकक्षता प्रस्थापित करण्यासाठी कोणतेही पाऊल उचललेले दिसून येत नाही. कृषी आयुक्तांच्या दालनात झालल्या बैठकीत निदर्शनास आले, की फक्त तालुका कृषी अधिकारी ३५१ पदे वर्ग एक केलेली आहेत. उर्वरित पदे वर्ग दोनच ठेवलेली आहेत. असे झाल्यास अजून एक संवर्ग तयार होणार आहे.पदोन्नतीच्या संधी सुद्धा कमी होतील.

२१ मेपासून आंदोलनाचा इशारा

कृषी सेवा वर्ग २ संवर्गाचे अस्तित्व धोक्यात आल्याची तीव्र भावना सर्वांमध्ये तयार झाल्याने आंदोलनाची भूमिका घेण्यावर सर्वांचे एकमत झालेले आहे. त्यानुसार महाराष्ट्र कृषी सेवा वर्ग २ हा संपूर्ण संवर्ग १ करण्याची मागणी मान्य न झाल्यास बुधवार (ता.२१) पासून आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष विनय कदम, सरचिटणीस गोरख तरटे यांनी दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT