Ravikant tupkar Agrowon
ॲग्रो विशेष

Elgar Yatra : सोयाबीन-कापूस प्रश्‍नावरील एल्गार रशयात्रा अंतिम टप्प्यात

Ravikant tupkar : बुलढाणा जिल्ह्यातील विविध तालुक्यांत प्रवास करीत ही रथयात्रा सोमवारी (ता. २०) बुलडाण्यात पोहोचणार असून या वेळी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

Team Agrowon

Buldhana News : सोयाबीन-कापूस उत्पादकांचे प्रश्‍न शासनापुढे मांडण्याच्या उद्देशाने सुरू असलेली एल्गार रथयात्रा अंतिम टप्प्यात आली आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यांत प्रवास करीत ही रथयात्रा सोमवारी (ता. २०) बुलडाण्यात पोहोचणार असून या वेळी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

सोयाबीन, कापूस, भात उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आंदोलनाची घोषणा केली आहे. यासाठी ५ नोव्हेंबरपासून एल्गार रथयात्रा बुलडाणा जिल्ह्यातील गावागावांत फिरत आहे. यावर्षी जेमतेम पाऊस झालेला आहे. तसेच सोयाबीन पिकावर मूळ-खोडकुज, यलो मोझॅकही आल्याने उत्पादन एकरी क्विंटल कमी झाले. तसेच सोयाबीनचे दरही जेमतेम पाच हजारांपर्यंत असल्याने खर्च कसा भागवावा हा पेच आहे.

कपाशी पिकाचीही अशीच गत आहे. एकरी क्विंटलपासून कापूस येत आहे. उत्पादन व खर्चाचा ताळमेळ पूर्णतः कोलमडला आहे. यामुळे सोयाबीन, कापूस या प्रमुख पिकांना उत्पादन खर्चावर आधारित भाव शासनाने द्यावा या प्रमुख मागणीसह इतर मुद्यांवर सोमवारी एल्गार महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे. यासाठी गावागावांना भेटी देत तुपकर हे शेतकऱ्यांसोबत संवाद साधत आहेत. शेतकरी या सभांना चांगली गर्दी करीत असल्याने महामोर्चासाठी पोषक वातावरण तयार होत आहे.

मागील वर्षात केलेल्या विविध आंदोलनांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली होती. मात्र, दरांच्या मुद्यावर शासनाने फसवणूक केली, असा आरोप तुपकर हे सभांमधून करीत आहेत. त्यामुळे यंदा आपल्या हक्क्यांच्या मागण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली ताकद दाखवावी, असे ते सांगत आहेत. आंदोलनात शेतकरी स्वयंस्फूर्तीने सहभागी होत प्रतिसाद देत आहेत. आर्थिक मदतही गोळा होऊ लागली आहे.

सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या प्रश्‍नांवर सुरू केलेल्या एल्गार रथयात्रेला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. गावागावात मोठी गर्दी होत असून या उत्पादकांच्या मनातील खदखद दिसून येते. सोमवारी (ता. २०) होणाऱ्या एल्गार महामोर्चाच्या माध्यमातून शेतकरी आपली ताकद सरकारला दाखवून देतील हा विश्‍वास निर्माण झाला आहे.
- रविकांत तुपकर, शेतकरी नेते

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Agriculture Input: बनावट निविष्ठांचे जाळे राज्यांच्या सीमापार

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवरील आंदोलन आणि सप्तपर्णीची अ‍ॅलर्जी

Fake Pesticide Issue: बनावट कीडनाशके : हवी सक्षम यंत्रणा

Tissue Culture Lab Scheme: उती संवर्धन प्रयोगशाळेसाठी अर्जाची संधी

Agriculture Services Reform: कृषी विभागाच्या अकरा सेवांचे डिजिटल सुसूत्रीकरण

SCROLL FOR NEXT