Agriculture Conference Session
Agriculture Conference Session Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Conference Session : विखे पाटील कृषी परिषदेच्या अधिवेशनात अकरा मान्यवरांचा होणार सन्मान

Team Agrowon

Nagar News : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढणाऱ्या पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील (Padmashri Dr. Vitthalrao Vikhe Patil) कृषी परिषदेचे ११ वे राज्यस्तरीय अधिवेशन यंदा शिर्डी जि. नगर येथे रविवारी ता. २६ होत आहे.

त्यात विविध क्षेत्रातील राज्यभरातील मान्यवरांचा गौरव केला जाणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी दिली.

भागवत देवसरकर म्हणाले, की डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या अधिवेशनाचे उद्घाटन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी माजीमंत्री अण्णासाहेब मस्के पाटील असतील.

नगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील, महानंद चे अध्यक्ष राजेश परजने, भारतीय जनता पार्टीचे सहमुख्यप्रवक्ते अजित चव्हाण उपस्थित राहणार आहेत.

अधिवेशनाचे नियोजन स्वागतध्यक्ष खासदार सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनात होत असून अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातील कृषी व इतर क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव होणार आहे.

महाअधिवेशन यशस्वी करण्यासाठी संयोजन समिती स्थापन केली असून या संयोजन समितीमध्ये गुणवंत आठरे पाटील, सुहास ब्राह्मणे, सचिन शिंदे पाटील, अपर्णा हासे पाटील असणार आहेत, तर राज्यभरातून प्रा. विवेक सुकणे पाटील, सुचिताताई पाटील, संगीता इंगोले, बालाजी सूर्यवंशी, रूपाली देशमुख, विठ्ठल गलबे, एकनाथ मोरे, सोनाली गर्जे परळकर, विनीत पाटील, धनंजय फिरके, परमेश्वर काळे, मोतीराम पवार, गजानन ढगे, पांडुरंग पोपळे, श्रीकांत शिंदे, संदीप पावडे, भावना सरनाईक, रावसाहेब घुमरे, संतोष पाटील सूर्यवंशी, ज्ञानेश्वर चौधरी, प्रदेश सल्लागार धनंजय पाटील यांच्यासह पदाधिकारी संयोजन समितीत काम करत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT