Electricity  Agrowon
ॲग्रो विशेष

Electricity Connection : आजऱ्यातील आजींना मिळाला ‘आपुलकीचा प्रकाश’

Mahavitaran : आजरा शहरातील गांधीनगर भागातील नेवरेकर कॉलनीत राहणाऱ्या श्रीमती सुशीला तुकाराम यादव (वय ६२ वर्षे) या एकट्या आजीबाई राहतात. पतीच्या निधनानंतर मुलगाही वारला.

Team Agrowon

Kolhapur News : जिल्ह्यातील आजरा महावितरणच्या वीज कर्मचाऱ्यांनी एका आजीबाईंच्या घरात मीटर जोडून नवीन वीजजोडणी दिली. आणि दिवाळीला आजीच्या जीवनात ‘आपुलकीचा प्रकाश’ फुलविला.

दिवाळीच्या पूर्वसंध्येला कार्यालयात येऊन आजीबाईनी विजेची मागणी केली. आजीकडे नवीन वीजजोड देण्यासाठी घरात कुठलीच सुविधा नव्हती, त्यांची आर्थिक परिस्थिती गंभीर असल्याचे वीज कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. क्षणाचाही विलंब न लावता कर्मचाऱ्यांनी पैसे जमा करून त्या आजींना नवीन वीजजोडणी दिली.

आजरा शहरातील गांधीनगर भागातील नेवरेकर कॉलनीत राहणाऱ्या श्रीमती सुशीला तुकाराम यादव (वय ६२ वर्षे) या एकट्या आजीबाई राहतात. पतीच्या निधनानंतर मुलगाही वारला. पूर्वी रॉकेल नंतर डिझेलच्या प्रकाशात राहायच्या. अंधारामुळे माझ्याकडे यायला न धजावणारी नातवंड आता मला येऊन बिलगतील, या भावनेने गहिवरल्या.

शाखा अभियंता निखिल मोगरे, प्रधान तंत्रज्ञ विनायक खोत, वरिष्ठ तंत्रज्ञ नागनाथ पवार, तंत्रज्ञ विनोद कांबळे, तंत्रज्ञ साहिल दोरुगडे, तंत्रज्ञ लहू कापडूसकर, तंत्रज्ञ सुशांत कांबळे यांनी पुढाकार घेतला. याबद्दल गडहिंग्लज कार्यकारी अभियंता विजयकुमार आडके, उपकार्यकारी अभियंता सुहास मिसाळ यांनी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Fertiliser Linking : उत्तर प्रदेशच्या धर्तीवर खत लिकिंगसाठी महाराष्ट्रात नवा नियम आणणार; कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची विधानसभेत माहिती

Crop Advisory: कृषी सल्ला : कोकण विभाग

Blight Disease: बदलत्या वातावरणात करपा रोगाची शक्यता

Raju Chaudhari Success Story: कडा ते कॅनडा

Nilesh Rane: कोकणातील आंबा, काजू बागायतदारांच्या मदत प्रश्नी निलेश राणेंनी कृषीमंत्र्यांना घेरले

SCROLL FOR NEXT