Monsoon Rain agrowon
ॲग्रो विशेष

Monsoon Rain : दिलादायक! यंदा अल् निनोचा प्रभाव होणार कमी, मॉन्सूनला पोषक; हवामान खात्याची माहिती

Weather Update : हवामान खात्याच्या माहितीनुसार यंदा अल निनोचा प्रभाव कमी होत असल्याची माहिती देण्यात आली.

sandeep Shirguppe

Monsoon Rain 2024 : अल् निनोमुळे २०२३ या सालात अत्यंत कमी पावसाची नोंद झाल्याने यंदा दुष्काळाच्या झळा जाणवत आहेत. दरम्यान हवामान खात्याच्या माहितीनुसार यंदा अल निनोचा प्रभाव कमी होत असल्याची माहिती देण्यात आली. यामुळे देशभरातील २५ राज्यात कमी पावसाने यंदा दुष्काळाची स्थिती बनली आहे तसेच पावसाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी हवामान खात्याने रविवारी (ता.११) दिली आहे.

प्रशांत महासागरातील उष्ण पाण्याचा प्रवाह असलेल्या 'अल् निनो' चा प्रभाव कमी होणार असल्याने देशातील नैऋत्य मोसमी पाऊस चांगला पडेल, अशी अपेक्षा वेगवेगळ्या हवामान संस्थांनी व्यक्त केली. देशात २०२३ हे साल सर्वांत उष्ण ठरले. 'अल निनो' सक्रिय झाल्याने अनेक राज्यांमध्ये पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. याचबरोबर महाराष्ट्रासह कर्नाटकातील अनेक जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला.

गेल्या वर्षी पावसाने दडी मारली. बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. त्यामुळे हिवाळ्यातच शहरांमध्ये पाणी टंचाई निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे. शेतकरी दुष्काळाने होरपळत आहे. त्यामुळे हवामान खात्याने दिलेल्या माहिती आनंद निर्माण करणारी आहे.

हवामान खात्याकडून 'अल निनो'चे बारकाईने निरीक्षण केले जात आहे. येत्या जूनपर्यंत उष्ण पाण्याच्या प्रवाहाची तीव्रता कमी होऊन तो सामान्य होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या जून ते ऑगस्ट या दरम्यान प्रशांत महासागरातील थंड पाण्याच्या प्रवाह 'ला निना'ची स्थिती येईल, त्याचा परिणाम होऊन यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत देशात मॉन्सून चांगला राहील, असेही खात्यातर्फे सांगण्यात आले आहे.

मात्र, 'स्प्रिंग प्रेडिक्टेबिलिटी बॅरियर' चा संदर्भ देत हवामान अंदाजात काही प्रमाणात कमी- जास्त होऊ शकते, असा सावधगिरीचा इशाराही देण्यात आला आहे. देशात पडणाऱ्या एकूण पावसापैकी ७० टक्के पाऊस मॉन्सूनचा असतो. शेतकरी, शेती उत्पादन आणि अर्थव्यवस्था यांच्यासाठी हा पाऊस महत्त्वाचा ठरतो.

तज्ज्ञांचे म्हणणे

एप्रिल-जूनपर्यंत 'अल निनो' सामान्य असण्याची शक्यता ७९ टक्के आहे आणि जून-ऑगस्टमध्ये 'ला निना' विकसित होण्याची शक्यता ५५ टक्के आहे, अशी माहिती 'युनायटेड स्टेट्सच्या नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशन'ने (एनओएए) गेल्या आठवड्यात दिली.

युरोपियन युनियनच्या 'कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिस'ने देखील 'अल निनो'चा प्रभाव कमी होत आहे, याला पुष्टी दिली आहे. भारतीय हवामान खात्याचे शास्त्रज्ञ डॉ. डी. शिवानंद पै म्हणाले, "सध्याच्या हवामान स्थितीबाबत निश्चित भाष्य करता येत नाही. कारण, काही हवामान प्रारूपे 'ला निना'चा अंदाज देत आहेत, तर काही 'एल निनो' सामान्य राहील, असेही सांगत आहेत."

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Manoj Jarange Patil: १५ सप्टेंबरला अंतरवाली सोडणार, चार मुक्काम करत पाचव्या दिवशी मुंबईत धडकणार, मनोज जरांगेंची घोषणा

Pending Water Charges: ताकारीचे पाणी पाहिजे, आधी थकीत पाणीपट्टी भरा

MPSC Paper Leak : ‘एमपीएससी’ पेपरफुटीची सखोल चौकशी करा

Farmer Demands: मुक्ताईनगर तालुक्यात दुष्काळ जाहीर करा

Land Revenue Code: भडगाव तहसीलदारांचा पाय खोलात

SCROLL FOR NEXT