Water Scarcity  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : टंचाईग्रस्त दहा गावांसाठी आठ विहिरी अधिग्रहित

Water Crisis : धुळे तालुक्यात मार्चमध्येच अनेक गावांना पाणीटंचाई जाणवत असून, ती दूर करण्यासाठी तात्पुरती उपाययोजना केली जात आहे.

Team Agrowon

Dhule News : धुळे तालुक्यात मार्चमध्येच अनेक गावांना पाणीटंचाई जाणवत असून, ती दूर करण्यासाठी तात्पुरती उपाययोजना केली जात आहे. तालुक्यातील दहा गावांना तीव्र पाणीटंचाईमुळे आठ विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या असून, दोन गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

टंचाईग्रस्त दहा गावांपैकी तीन गावांना जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्या असून, दोन गावांतील योजनेचे काम पूर्ण झाले आहे. एका गावातील योजना प्रगतिपथावर आहे.

तालुक्यात १६५ गावे असून, दहा लाखांहून अधिक लोकसंख्या आहे. तालुक्यातील लघु व मध्यम प्रकल्पाचे पाणी झपाट्याने खाली उतरत असल्याने एप्रिल ते जूनदरम्यान पाणीटंचाईग्रस्त गावांची संख्या वाढणार आहे. विहिरी, कूपनलिका आदी स्रोतही आटत आहेत. पाणीटंचाईसह चाराटंचाईलाही सुरवात झाली आहे. धुळे तालुक्यात सध्या १९ हजार १६० ग्रामस्थांना पाणीटंचाईची झळ बसली आहे.

धुळे तालुक्यातील दोन गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. त्याचा लाभ दोन हजार ६७६ ग्रामस्थांना होतो. धुळे तालुक्यातील आठ गावांना विहिरी अधिग्रहीत करून पाणीटंचाई दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. धुळे तालुक्यातील १६ हजार ९११ लोकांना विहीर अधिग्रहणातून दिलासा देण्याचे काम प्रशासनाकडून होत आहे.

तालुक्यातील धमाणे, आंबोडे, निमडाळे, नावरी, शिरधाने प्र. नेर, चिंचवार, तामसवाडी, हेंकळवाडी, तिसगाव, वडेल येथे तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. तिसगाव व वडेल येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असून, उर्वरित आठ गावांना विहिरी अधिग्रहीत केल्या आहेत. धमाणे, शिरधाणे, चिंचवार येथे जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्या. त्यांपैकी धमाणे व चिंचवारची योजना पूर्णही झाली आहे. तरीही टंचाई जाणवते हे विशेष. शिरधानेची योजना प्रगतिपथावर आहे.

आचारसंहितेमुळे अडथळा

धुळे तालुक्यात गेल्या वर्षी ३१ गावांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले होते. १२ गावांना विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या होत्या. टँकरद्वारे १९ गावांना पाणीपुरवठा करण्यात आला होता.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अद्याप तेवढी भयावह परिस्थिती निर्माण झाली नसली तरी एप्रिल किंवा मेमध्ये अधिक गावांना पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे आमदार, खासदारांसह स्थानिक लोकप्रतिनिधींना पाणीपुरवठा योजना राबविणे किंवा अधिकाऱ्यांना आदेश देण्यास मर्यादा आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer QR Code: खत उपलब्धतेची माहिती आता ‘क्यूआर कोड’वर

Cement Granding Project: प्रस्तावित सिमेंट प्रकल्पाला मंजुरी देऊ नका

Narnala Festival: नरनाळा महोत्सव म्हणजे शेतकऱ्यांच्या ‘जखमेवर मीठ’

Padma Shri Award: प्रजासत्ताक पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा; महाराष्ट्राच्या चार व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार जाहीर

Labor Supply Scam: ऊसतोड मुकादमांकडून वाहनधारकांची फसवणूक

SCROLL FOR NEXT