Maharashtra Forest Department Agrowon
ॲग्रो विशेष

Forest Department : वन विभागाच्या कारवाईत आठ टन खैराची लाकडे जप्त

Catechu Wood : ट्रकमधून अवैधरीत्या खैर लाकडाची वाहतूक केली जात असल्याने पेठ वनविभागाच्या फिरत्या पथकाने हा ट्रक जप्त करत त्यातील आठ टन खैर ताब्यात घेतले.

मुकूंद पिंगळे

Nashik News : ट्रकमधून अवैधरीत्या खैर लाकडाची वाहतूक केली जात असल्याने पेठ वनविभागाच्या फिरत्या पथकाने हा ट्रक जप्त करत त्यातील आठ टन खैर ताब्यात घेतले. विभागीय वन अधिकारी (दक्षता) विशाल माळी यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आली.

माळी यांना खैर लाकडाची ट्रकमधून अवैधरीत्या वाहतूक केली जात असल्याची माहिती कळताच त्यांनी माहितीच्या आधारे वनविभागाच्या पेठ फिरत्या पथकाने सावळघाट ते गोळशी फाटा दरम्यान (एमएच १४ केए ४५०३) हा ट्रक थांबवीत त्याची तपासणी केली असता त्यामध्ये पथकाला खैर लाकूड मिळून आले.

या बाबत त्यांनी ट्रक चालकाकडे चौकशी केली असता त्याच्याकडे वन विभागाचा वाहतूक करण्याचा कोणताही अधिकृत परवाना आढळून आला नाही. चालकाकडे अधिक चौकशी केली असता त्याने हा ट्रक गुजरातकडून मुंबईकडे घेऊन जात असल्याचे सांगितले.

त्यानंतर पथकाने ट्रकचालक शेषनाथ चौरसिया (४०, रा. गोंडा, उत्तर प्रदेश) यास ताब्यात घेतले. जप्त केलेल्या खैर लाकडांची मोजणी केली असता आठ टन साठा आढळून आला.

कोकण कनेक्शन असल्याचा संशय

अवैधरीत्या वाहतूक होत असलेल्या खैरचे कनेक्शन कोकणातील तस्कराशी संबंधित असल्याचा संशय वनविभागाला आहे. यासाठी कसून चौकशी केली जात आहे. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास वनविभागाकडून केला जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Narendra Modi : 'जनतेने ८० वेळा नाकारलेले आज संसदेचे कामकाज बंद पाडतायतं' पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

Inflation Control : वायदेबंदीमुळे महागाई नियंत्रणात बाधा?

Sharada Pawar : ‘लाडकी बहीण योजने’बाबत ‘मविआ’विरोधात खोटा प्रचार

Agriculture Commodity Market : तूर, हरभरा, कापसाच्या किमतीत घसरण

Cow milk Rate : गाय दूध खरेदी दरात ३ रुपयांची कपात, पश्चिम महाराष्ट्रातील दूध संघाचा निर्णय

SCROLL FOR NEXT