Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : विम्याचा लाभ देण्यासाठी आठ दिवसांचा अल्टिमेटम

Crop Insurance Scheme : मागील वर्षी पीकविमा काढलेल्या सहा लाख २३ हजार ९२१ शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या.

Team Agrowon

Yavatmal News : मागील वर्षी पीकविमा काढलेल्या सहा लाख २३ हजार ९२१ शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या. या शेतकऱ्यांना जोखमेनुसार नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख संजय रंगे यांनी दिली. येत्या आठ दिवसांत अधिसूचना लागू करा, अन्यथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांचे कपडे फाडू, असा इशाराही रंगे यांनी गुरुवारी (ता. एक) विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिला.

पुढे बोलताना ते म्हणाले, की विमा कंपनी आणि कृषी विभागाचे साटेलोटे आहे. सात लाख आठ हजार ३० हेक्टरवरील पिकांचा विमा शेतकऱ्यांनी काढला. त्यासाठी शासनाने ५०९ कोटी अकरा लाख १८ हजार रुपये विमा हप्ता दिला. रब्बी हंगामातही दोन लाख शेतकऱ्यांनी विमा काढला होता. दरम्यान, जिल्ह्यातील जवळपास सर्वच महसूल मंडळात तीन ते चारवेळा अतिवृष्टी झाली.

सोबतच येलो मोझॅक कीड रोगाने सोयाबीन पिकांचे नुकसान केले. असे असतानाही कृषी विभागाने अधिसूचना न लावल्याने सहा लाख २३ हजार ९२१ शेतकऱ्यांनी नुकसानाच्या ऑनलाइन तक्रारी नोंदविल्या. तरीसुद्धा बहुतांश शेतकऱ्यांना तक्रारी नोंदविता आल्याच नसल्याचा आरोप संजय रंगे यांनी केला. मध्यंतरी शिवसेनेने आंदोलन केल्यानंतर इन्शुरन्स कंपनीने काही शेतकऱ्यांचे दावे मंजूर केले.

परंतु नुकसानभरपाई देताना दुजाभाव केला. ही बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मागील वर्षी डिसेंबर महिन्यात जिल्हास्तरीय समितीची बैठक घेऊन पूर्वसूचना दाखल केलेल्या शेतकऱ्यांना जोखमीनुसार भरपाई द्यावी, असे आदेश दिले.

या आदेशाविरोधात कंपनीने आयुक्तांकडे धाव घेतली. आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जैसे थे ठेवले. तर राज्य शासनाकडे अपील केले असता, त्यांनीसुद्धा जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश कायम ठेवले.

मात्र, अद्याप कंपनीने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी केलीच नाही. आता येत्या आठ दिवसांत कृषी विभागाने अधिसूचना लागू केली नाही, तर अधिकाऱ्यांचे कपडे फाडण्याचा इशारा शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय रंगे, उपजिल्हा प्रमुख गजानन डोमाळे, संदीप सरोदे यांनी दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT