Egg Agrowon
ॲग्रो विशेष

Egg Market Rate : अंड्यांचे दर पोहोचले प्रति शेकडा ६२० रुपयांवर

Egg Market Price : पोषण आहारात समावेशामुळे मागणीत वाढ

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

विनोद इंगोले ः ॲग्रोवन वृत्तसेवा
Nagpur News : शालेय पोषण आहारात समावेशाच्या परिणामी मागणीत वाढ झाल्याने अंड्यांच्या दरात सातत्याने तेजी नोंदविली जात आहे.

शासनाच्या या निर्णयामुळे लेअर पोल्ट्री व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नागपुरात प्रति शेकडा दर ६२० रुपयांवर पोहोचले आहेत. अगोदर दर ६१७ होते.

देशाच्या विविध भागांतही अंडीदरांनी उसळी घेतली असून, कोलकाता घाऊक बाजारात गुरुवारी (ता. २१) अंडीदरात पूर्वीच्या ६२० रुपयांत २० रुपयांची वाढ नोंदविली गेली. त्यामुळे दर उच्चांकी ६४० रुपयांवर पोहोचले होते. मुंबईत आजचे दर ६४० रुपये आहेत. तमिळनाडू राज्यातील नमकल हे अंडी उत्पादनासाठी देशात प्रसिद्ध आहे.

या बाजारात अंड्यांचे दर दबावात असल्याचे चित्र होते. या ठिकाणी अंड्यांना ५५५ रुपयांचा दर मिळाला. या ठिकाणी पूर्वीच्या ५५० रुपयांत आज केवळ पाच रुपयांची वाढ नोंदविली गेली, असे बाजार सूत्रांनी सांगितले.

दरातील ही तेजी अशीच कायम राहणार असल्याचे संकेत या क्षेत्रातील जाणकारांनी दिले आहेत. त्यानुसार येत्या काळात अंडीदर प्रति शेकडा ६५० रुपयांवर पोहोचण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

नॅशनल एग्ज को-ऑर्डिनेशन समितीने गुरुवारी (ता. २०) संभावित दर ६४१ रुपये अधोरेखित केले होते. नागपुरात अंड्यांचे दर प्रति शेकडा ६२० रुपयांवर होते. त्यामुळे महाराष्ट्रात देखील येत्या काळात दरात तेजीचा अंदाज वर्तविला जात आहे.

थंडीत झालेली वाढ आणि शालेय पोषण आहारात शासनाने अंड्यांचा केलेला समावेश त्यामुळे राज्यात अंड्यांची मागणी अचानक वाढली आहे.

त्याच्या परिणामी देशांतर्गत बाजारातही अंडीदरात वाढ नोंदविण्यात आली आहे. सध्या ६२० ते ६४० रुपये प्रति शेकडा याप्रमाणे अंड्यांचे व्यवहार होत आहेत.
- रवींद्र मेटकर,
पोल्ट्री व्यावसायिक, अमरावती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Rainfall: पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

MKCL Investment: ‘एमकेसीएल’ने सरकारमध्ये गुंतवणूक करावी; शरद पवार यांची अपेक्षा

Market License Cancellation: पणन संचालकांचा खासगी बाजारांवर कारवाईचा धडाका; ‘रामेश्वर, ‘कसमादे’, ‘जय गजानन’ बाजारांचे परवाने रद्द

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT