Egg Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Egg Rate : अंडी दरातील तेजी कायम

Egg Market : प्रती शेकडा ५०६ ते ५१० रुपयांचा दर

Team Agrowon

Egg Production : गेल्या महिन्यात दबाव आल्यानंतर अंडी दरात तेजी अनुभवण्यात आली. ही दरातील तेजी आताही कायम असून ५०६ ते ५१० रुपये प्रती शेकडा असा दर अंड्यांना मिळत असल्याची माहिती पोल्ट्री व्यावसायिकांनी दिली.

राज्याची रोजची अंडी मागणी सरासरी एक कोटीच्या घरात आहे. तर दुसरीकडे शेतीपूरक तसेच स्वतंत्र पोल्ट्री व्यवसाय करणाऱ्यांची संख्या ही ९ लाख आहे. त्यामुळे राज्यातील अंड्यांची गरज पूर्ण होत नसल्याने देशातील इतर भागातून देखील अंडी राज्यात दाखल होतात.

सध्या तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने कोंबड्या जगविण्याचे मोठे आव्हान लेअर पोल्ट्री व्यावसायिकांसमोर आहे. पारा ४४ ते ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. त्यामुळेच पोल्ट्रीशेडमधील तापमान नियंत्रणासाठी पोल्ट्री व्यवसायिकांना अनेक उपाययोजनांवर भर द्यावा लागत आहे.

त्यानंतर देखील तापमान नियंत्रण साधले जात नसल्याने मर्तुकीचे प्रमाण वाढीस लागले आहे. त्याचाही अंडी उत्पादनावर परिणाम झाल्याने अंड्याचे दर वधारले आहेत. सध्या अंड्यांना ५०६ ते ५१० रुपये प्रतिशेकडा दर मिळत आहे.

एप्रिल महिन्यापर्यंत अंड्यांचे दर ३०० रुपयांवर होते. परिणामी उत्पादकता खर्चही निघत नव्हता, अशी स्थिती होती. तापमानात वाढीच्या परिणामी मर्तुक वाढल्याने हे दर आता वाढले आहेत. परिणामी पोल्ट्री व्यवसायिकांना दिलासा मिळाला आहे.

‘‘लेअर पोल्ट्रीकरीता ४५ रुपये प्रती नग असा पिल्लांचा दर आहे. त्यांना अंड्यांवर येईपर्यंत संगोपन करावे लागते यावर सुमारे ३५० रुपयांचा खर्च होतो. त्यानंतर अंडी उत्पादन व विक्री होते. गेल्या महिन्यात ३०० ते ३५० रुपये प्रती शेकडा असे अंड्याचे दर होते. दुसरीकडे साडेचार रुपये प्रती नग उत्पादकता खर्च आहे,’’ अशी माहिती अमरावतीतील पोल्ट्री व्यावसायिक रवींद्र मेटकर यांनी दिली.

दरातील घसरणीमुळे उत्पादकता खर्चाची भरपाई होत नव्हती आता शेकडा अंड्यांचे दर ५०६ ते ५१० रुपयांवर आहेत. त्यामुळे दिलासा मिळाला आहे.
- रवींद्र मेटकर,
पोल्ट्री व्यावसायिक अमरावती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Alert: उद्यापासून वादळी पावसाचा अंदाज; राज्यातील काही भागात आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा इशारा

Urea Fertilizer Alternatives: युरिया खताला पर्यायी खते कोणती?

Animal Vaccination Camp: मुरादपूर येथे जनावरांसाठी आरोग्य तपासणी, लसीकरण शिबिर

Argentina Agriculture Market: अर्जेंटिनामध्ये फळे, प्रक्रिया उत्पादनांना मागणी

Summer Health Safety: उष्माघात दक्षतेबाबत यंत्रणा सुसज्ज ठेवा

SCROLL FOR NEXT