Maharashtra Farmer Loan Waiver Scheme 2026 Update: ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची तिसरी यादी सोमवारी (दि. १२ ऑक्टोबर) राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली. या यादीत ३ लाख ५१ हजार १९२ पात्र शेतकऱ्यांचा समावेश आहे. या पात्र शेतकऱ्यांना आता कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार आहे. या शेतकऱ्यांनी त्यांच्या कर्जखात्याची थकबाकी तपासावी आणि जवळच्या आपले सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण प्रक्रिया करून घ्यावी, असे आवाहन राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले आहे. .कर्जमुक्ती योजनेंतर्गत १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ दरम्यान वितरित झालेले आणि ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेले आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेले पीककर्ज तसेच पुनर्गठित व फेरपुनर्गठित २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. .Farm Loan Waiver: कर्जमाफीच्या तिसऱ्या टप्प्यातील लाभ वितरण सुरु, ३ लाख २७ हजार लाभार्थी शेतकरी.या योजनेची अंमलबजावणी ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे केली जात आहे. त्यासाठी महाआयटीची नियुक्ती केली आहे. या योजनेच्या पोर्टलवर बँकांनी एकूण ३१.१७ लाख थकीत कर्जखात्यांची माहिती अपलोड केली आहे. आतापर्यंत एकूण २४.६७ लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या आधार प्रमाणीकरण प्रक्रियेसाठी प्रसिद्ध केल्या आहेत, अशी माहिती सहकारमंत्र्यांनी दिली..Farm Loan Waiver: 'त्या' ६ ते ७ लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा, अतिरिक्त व्याज हटवले.विभागनिहाय शेतकऱ्यांची संख्यायात छत्रपती संभाजीनगर विभागातील २ लाख ६ हजार ४५०, अमरावती विभागातील ८५ हजार ७६, नागपूर विभागातील ३० हजार ७३८, नाशिक विभागातील १४ हजार २४४, पुणे विभागातील ११ हजार ९२८ आणि कोकण विभागातील २ हजार ७५६ शेतकऱ्यांचा समावेश आहे..पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्धतिसऱ्या यादीमधील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या जिल्हानिहाय याद्या बँक शाखा, विकास संस्था तसेच ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यात समावेश असलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्तीचा लाभ दिला जात आहे. त्यासाठी कर्ज थकबाकीची खातरजमा करून आधार प्रमाणीकरण करायला हवे, असे आवाहन करण्यात आले आहे..या यादीतील शेतकऱ्यांच्या कर्ज थकबाकीची रक्कम ३१ मार्च २०२६ रोजीच्या स्थितीनुसार नमूद केली आहे. त्याचे १ एप्रिल २०२६ पासूनचे पुढील व्याज व इतर खर्चही माफ केले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ३१ मार्च २०२६ रोजीची कर्ज थकबाकी तपासावी आणि जवळच्या आपले सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण पूर्ण करावी..राष्ट्रीयीकृत व व्यापारी बँकांच्या यादीतील काही शेतकऱ्यांची ३१ मार्च २०२६ रोजीची कर्ज थकबाकी २ लाख रुपयांहून अधिक असली, तरी शासनाच्या ‘हेअर कट’ धोरणानुसार संबंधित कर्जे पूर्णपणे निरंक करण्यात येणार आहे. तसेच या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकरी मयत झालेला असल्यास त्यांच्या वारसांना तसेच वयस्कर व बोटांच्या ठशाची नोंद होत नसलेल्या लाभार्थ्यांनाही कर्जमुक्तीचा लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्या अनुषंगाने १९ ऑगस्ट २०२६ रोजी मानक कार्यप्रणाली (एसओपी) जारी केली होती..आधार प्रमाणीकरण केल्यानंतर कर्जमुक्तीची रक्कम संबंधित शेतकऱ्याच्या कर्ज खात्यावर जमा करण्यात येईल. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करुन घ्यावी. जेणेकरुन या योजनेचा लाभ घेता येईल, असे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी म्हटले आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.