Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Compensation : भरपाई देण्यासाठी प्रयत्न करणार

Team Agrowon

Buldana News : सिंदखेड राजा तालुक्यामध्ये मॉन्सूनोत्तर पावसाने कपाशी, तूर, द्राक्ष यांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यांची पाहणी करीत पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे शेतकऱ्यांना आश्वस्त केले.

तालुक्यातील सावरगाव माळ, पळसखेड चक्का, पिंपळगांव लेंडी येथील द्राक्षबाग, कपाशी, तूर यांसह इतर पिकांची बांधावर जाऊन पाहणी केली. पालकमंत्री वळसे पाटील म्हणाले, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने सर्व अधिकाऱ्यांना परिसरातील शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

मागच्या कॅबिनेटमध्ये पाऊस नुकसानीबाबत चर्चा झाली. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनातमध्येही चर्चा होणार आहे. नुकसान भरपाईसाठी केंद्र शासनाची काही नियमावली आहे. राज्य सरकारची नियमावली वेगळी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्त मदत देण्यासाठी राज्याचे मंत्रिमंडळ निर्णय घेणार आहे.

तालुक्यामध्ये शेतकऱ्यांनी सीडनेटच्या माध्यमातून मिरची व अन्य बीजोत्पादन घेतले आहे. एकट्या पळसखेड चक्का येथे शंभर शेतकऱ्यांनी, तर तालुक्यात २ हजार शेतकऱ्यांनी सीडनेट उभे करून मोठे उत्पन्न घेण्याचे स्वप्न पाहिले होते.

आमदार डॉ राजेंद्र शिंगणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा परिषद मुख्याधिकारी भाग्यश्री विसपुते, उपविभागीय अधिकारी समाधान गायकवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे, कृषी अधिकारी भागवत किंगर, इतर उपस्थित होते.

‘१०० टक्के मदत द्या’

पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पळसखेड चक्का येथील शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. या वेळी शेडनेट उभारण्यासाठी सरकारने १०० टक्के मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. सिडनेटला पीक विम्यामध्ये समावेश करण्याचीही मागणी केली. सीडनेटमध्ये घेणाऱ्या पिकांचा विमा निघत नाही. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही मदत मिळत नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Price : सोयाबीनची दरवाढ हंगामात टिकेल का?

Dairy Development Project : विदर्भ, मराठवाड्यासाठी दूध विकासाचा दुसरा टप्पा मंजूर

Jute Export : तागाची १७७ हजार टन निर्यात

PM AASHA : शेतीमालाचे दर सावरण्यासाठी ३५ हजार कोटी

Maharashtra Rain : पावसाला पोषक हवामान

SCROLL FOR NEXT