Nashik News : प्रयोगशील शेतकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. माझी शेतकऱ्यांशी नाळ जोडली असून येत्या काळात शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाने शेती विकसित करता यावी यासाठी काम सुरू आहे.
कृषी संशोधनाला अधिक चालना मिळण्यासाठी कृषी विद्यापीठांचा स्तर वाढवणे गरजेचे आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील विद्यापीठांप्रमाणे कामकाज होण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील, असे प्रतिपादन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले.
कृषिमंत्री कोकाटे यांचा शनिवारी (ता. १) शहर-जिल्ह्यातील स्नेहीजनांच्या वतीने गुरुदक्षिणा सभागृहात सर्वपक्षीय नागरी सत्कार करण्यात आला. या वेळी ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे अध्यक्षस्थानी होते. या वेळी व्यासपीठावर आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, माजी खासदार देविदास पिंगळे, मविप्र संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे, अॅड. जयंत जायभावे आदी उपस्थित होते.
या वेळी कोकाटे म्हणाले, शेतीत नवीन विकसित वाण, पीकपद्धतीत सुधारणा होत आहेत. या शेती उत्पादनांना गाव, तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी विक्री व्यवस्था व बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी पणन मंत्री यांच्यासमवेत चर्चा करून शासनस्तरावर प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजप माझ्यासाठी लकी ठरला नाही पूर्वी काँग्रेस पक्षाची जशी स्थिती होती, तशी सध्या भाजपची स्थिती आहे. भाजपची उमेदवारी मिळाली की, माणूस निवडून येतो. २०१८ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांसह सर्वजण निवडून आले मी मात्र पराभूत झालो. त्यामुळे भाजप हा माझ्यासाठी लकी ठरला नाही. राजकारणात २८ वर्षे वनवास भोगला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तो दूर केला, असा आवर्जून उल्लेख केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.