Illegal Sand Mining Agrowon
ॲग्रो विशेष

Sand Excavation : वाळू उपसा रोखण्याचा प्रयत्न: केनियंत्राचे दोर जाळले

Sand Mining : गोदापत्रातून होत असलेल्या अवैध वाळू उपशावर बुधवारी (ता. आठ) महसूल विभागाने कारवाई केली. यात केनियंत्रासाठी वापरले जाणारे दोर महसूलच्या पथकाच्या हाती लागले.

Team Agrowon

Gondi News : गोदापत्रातून होत असलेल्या अवैध वाळू उपशावर बुधवारी (ता. आठ) महसूल विभागाने कारवाई केली. यात केनियंत्रासाठी वापरले जाणारे दोर महसूलच्या पथकाच्या हाती लागले. हे दोर गोळा करून ते पथकाने जाळून नष्ट केले आहेत.

शहागड, वाळकेश्र्वर, कुराण, पाथरवाला बु., गोंदी, हसनापूर या गावांतील गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.

दरम्यान, गोंदी परिसरातील सिद्धेश्वर मंदिर परिसर व हसनापूर येथील या अवैध वाळू उपसा करणाऱ्या केनियंत्राचे पात्रात पसरलेले दोर व चाक्या बुधवारी महसूल विभागाच्या पथकाने गोळा करून ते जाळून टाकले.

या पथकात मंडळ अधिकारी संदीप नरोटे, कृष्णा एडके, तलाठी किरण जाधव, विनोद ठाकरे, गुरव, कोतवाल अशोक शिंदे, अरुण पठाडे व खंडागळे यांचा समावेश होता.

रात्रंदिवस अवैध उपसा

अवैध वाळू उपशावर पोलिस व महसूल विभागाच्या कारवाया नेहमीच सुरू असतात; परंतु कारवाई करून पथक माघारी फिरताच पाण्याने भरलेल्या पात्राच्या काठावर ट्रॅक्टरला केनियंत्र जोडून वाळूचोर अवैध उपसा करतात, हे विशेष. त्यामुळे साहजिकच एकाने मारल्यासारखे करणे आणि दुसऱ्याने रडल्यासारखे असाच हा प्रकार आहे. याला पोलिस व महसूल अधिकाऱ्यांचे या वाळू चोरांशी असलेले अर्थपूर्ण संबंधही कारणीभूत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Procurement Date Extension : कापूस खरेदीला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ; शेतकऱ्यांसाठी सीसीआयचा महत्वाचा निर्णय

Sugarcane FRP: ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ४,६०१ कोटी एफआरपी थकीत, ४५ कारखाने रडारवर

Raisin Export: बेदाणा निर्यात ८१ टक्क्यांनी घटली, द्राक्ष उत्पादक संकटात; सरकारची कबुली

Bageshwari Lake: बागेश्वरी तलाव परिसर पर्यटनाचे नवे केंद्र

Maize Procurement: मक्याचे दर घसरले; २५ हजार क्विंटल खरेदीवर ब्रेक

SCROLL FOR NEXT