
Yavatmal News : यवतमाळ : कार्यालयात झोपून असलेल्या तलाठ्यावर तीन वाळू तस्करांनी लोखंडी रॉडने हल्ला चढविला. या हल्ल्यात तलाठी गंभीर जखमी झाला. हल्ल्यानंतर तिन्ही तस्करांनी घटनास्थळावरून पळ काढला. हा प्रकार राळेगाव तालुक्यातील वाढोणा बाजार येथे घडला. मिलिंद नामदेवरव लोहत (वय ४३) असे जखमी तलाठ्याचे नाव आहे.
या प्रकरणी वडकी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून, प्रतीक वाढोणकर याच्यासह इतर दोन, अशा तीन तस्करांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राळेगाव तालुक्यातील वाढोणा बाजार येथील तलाठी मिलिंद लोहत हे मूळचे वर्धा जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
अशात अॅग्रिस्टॅक सर्व्हेच्या कॅम्पमध्ये सलग तीन दिवस हजर राहण्याचे आदेश लोहत यांना देण्यात आले होते. त्या अनुषंगाने तलाठी मिलिंद लोहत कार्यालयातच झोपले होते. अशात महसूल सेवक घरी निघून गेल्यानंतर काही व्यक्तींनी तलाठी कार्यालयाचा दरवाजा उघडून टेबल फेकून दिला. त्यानंतर तिघांनी संगनमत करून लोखंडी रॉडने डोक्यावर हल्ला केला. या वेळी प्रतिकार केला असता, दोघांनी पकडून मारहाण केली.
या वेळी जोरात आरडाओरड केली असता, आजूबाजूच्या लोकांनी धाव घेतली. तेव्हा तिन्ही आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. डोक्यातून रक्तस्राव चालू असल्याने कार्यालयाशेजारील प्रकाश पोपट आणि नागरिकांनी उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, तलाठी मिलिंद लोहत यांनी राळेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
गुरुवारीच केली होती शिविगाळ
वाढोणाबाजार येथील तलाठी कार्यालयात प्रतीक वाढोणकर आणि त्याच्या साथीदारांनी गुरुवारी (ता. १२) सकाळी कार्यालयात येऊन शिविगाळ केली. वाळूच्या गाड्या का चालू देत नाही, असे म्हणून दम दिला. तेव्हा अवैध गौण खनिज वाहतूक चालू देणार नसल्याचे तलाठी मिलिंद लोहत यांनी सांगितले. त्या कारणामुळेच वाळू तस्करांनी हल्ला केल्याचा आरोप तलाठ्याने तक्रारीतून केला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.