Solapur News : केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण शासकीय पातळीवर प्रयत्नशील असून, करमाळ्यात शेलगाव येथे केळी संशोधन केंद्रासाठी आपण पाठपुरावा करत असल्याचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी शुक्रवारी (ता. ३१) येथे सांगितले.
कंदर (ता. करमाळा) येथे महाराष्ट्र केळी उत्पादक शेतकरी संघाच्या केळी परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी आमदार मोहिते पाटील बोलत होते. या वेळी केळीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या शेतकऱ्यांना केळीरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले. संघाचे अध्यक्ष अतुल माने- पाटील अध्यक्षस्थानी होते.
केळी उत्पादक संघाचे अध्यक्ष किरण चव्हाण, माफदाचे अध्यक्ष विनोद तराळ, केळी उत्पादक संघाचे उपाध्यक्ष राहुल बच्छाव- पाटील, सचिन गांगर्डे, सचिन कोरके, नामदेव वालेकर, जिल्हा परिषद सदस्य सवितादेवी राजे भोसले, संजय पाटील,भारत पाटील, प्रमोद कुटे, अजित तळेकर, दीपक देशमुख, अमर साळुंके, सरपंच मौला मुलाणी या वेळी उपस्थित होते.
श्री. मोहिते पाटील म्हणाले, केंद्र शासनाच्या केळी उत्पादन करणाऱ्या जिल्ह्यांच्या सूचीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे नाव नाही या सूचीमध्ये सोलापूर जिल्ह्याचा समावेश केला पाहिजे. शेतकऱ्यांना फायदेशीर असलेली किसान रेल सुरू झाली पाहिजे, शेलगाव येथील केळी संशोधन केंद्र असो अथवा केळीचा भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेत समावेश करण्यासाठी आपण आग्रही आहोत.
प्रास्ताविक संघाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील यांनी केले. तालुकाध्यक्ष वैभव पोळ, सागर रणदिवे, अभिजित भांगे एकनाथ कोरके, संतोष उपासे, केशव गायकवाड यांनी स्वागत केले. यानंतर संस्थापक अध्यक्ष किरण चव्हाण यांनी उत्पादकांच्या समस्या मांडल्या. त्यात केळीला हमीभाव मिळाला पाहिजे, अशी मागणी केली.
राज्य शासनाच्या अनास्थेमुळे दुधाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत भाव मिळत नाही. साधारण पस्तीस रुपये दर मिळायला हवा. कारण अनेक शेतकऱ्यांकडे घरचा चारा नाही, पशुखाद्याचे दर वाढत असताना दर कमी करत असल्याने मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे हा व्यवसाय कसा जगवावा असा प्रश्न आहे.देविदास पिसे, दूध उत्पादक शेतकरी, मोहोज देवढे, ता. पाथर्डी, जि. नगर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.