Goat Agrowon
ॲग्रो विशेष

Goat Health : वाढत्या थंडीचा शेळ्यांवरील परिणाम

Impact on Cold Weather : वाढत्या थंडीचा शेळ्यांचे आरोग्य आणि उत्पादन क्षमतेवर नकारात्मक परिणाम होतो. थंडीच्या हंगामात योग्य व्यवस्थापन न केल्यास शेळ्यांचे आरोग्य बिघडू शकते.

डॉ. कल्याणी सरप

डॉ. कल्याणी सरप

Animal Husbandry : वाढत्या थंडीचा शेळ्यांचे आरोग्य आणि उत्पादन क्षमतेवर नकारात्मक परिणाम होतो. थंडीच्या हंगामात योग्य व्यवस्थापन न केल्यास शेळ्यांचे आरोग्य बिघडू शकते. त्यातून आर्थिक तोटा होण्याची शक्यता असते.

थंडीच्या काळात शेळ्यांना शरीरातील उष्णता टिकवून ठेवणे कठीण होते. त्यामुळे त्यांचे शरीर जास्त ऊर्जा खर्च करते. यामुळे वजन घटणे, कमकुवतपणा आणि हायपोथर्मियासारख्या आजारांचा धोका वाढतो.

थंडीच्या काळात शेळ्यांना जास्त पोषणमूल्य असलेल्या आहाराची गरज असते. चाऱ्यातून पुरेशी उष्णता मिळाली नाही तर शेळ्यांच्या आरोग्यावर व उत्पादनावर परिणाम होतो.

थंडीमुळे शेळ्यांचे दूध उत्पादन घटते. तसेच प्रजनन क्षमतेवरही परिणाम होऊन गर्भधारणेसाठी अडचणी येऊ शकतात. यामुळे नुकसान होऊ शकते.

न्यूमोनिया, खोकला व इतर श्वसनासंबंधी आजार होण्याचा धोका जास्त असतो. याशिवाय ओलसर आणि थंड परिस्थितीत त्यांच्या पायांमध्ये जखमा व संसर्ग होण्याची शक्यता वाढते.

शेळ्यांना उबदार आणि कोरड्या निवाऱ्याची गरज असते. गोठा उष्णता टिकवून ठेवणारा, वाऱ्यापासून संरक्षण करणारा व स्वच्छ असावा. शेळ्यांच्या आरामासाठी कोरड्या गवताचा वापर करावा.

उपाययोजना

ऊर्जायुक्त चारा जसे की डाळीचे काड, गहू कुटार व खनिज मिश्रण द्यावे.

उबदार ठेवण्यासाठी त्यांच्या अंगावर गोंड्याचे कपडे घालावेत.

लसीकरण व नियमित आरोग्य तपासणी करून आजारांपासून संरक्षण करावे.

गोठ्यात उबदार वातावरण ठेवण्यासाठी गवताचा थर आणि योग्य वायुविजन व्यवस्था करावी.

डॉ. कल्याणी सरप ९०९६८७०५५०

(विषय विशेषज्ञ (पशुसंवर्धन), कृषी विज्ञान केंद्र,हिवरा,जि.गोंदिया)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT