River Conservation Agrowon
ॲग्रो विशेष

River Conservation : नदीसंवर्धनासाठी संवाद पदयात्रा प्रभावीपणे राबवू

Water Conservation : ‘चला जाणूया नदीला’ अभियानाअंतर्गत दुसऱ्या टप्प्यात कृष्णा नदीसाठी नदी समन्वयक व नदी प्रहरी यांच्यामार्फत २१ ते २८ जानेवारी या कालावधीत संवाद यात्रा निघणार आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Samgli News : ‘चला जाणूया नदीला’ अभियानाअंतर्गत दुसऱ्या टप्प्यात कृष्णा नदीसाठी नदी समन्वयक व नदी प्रहरी यांच्यामार्फत २१ ते २८ जानेवारी या कालावधीत संवाद यात्रा निघणार आहे. ही यात्रा प्रभावीपणे राबवू, असा विश्‍वास कृष्णा व तीळगंगा नदी केंद्रस्थ अधिकारी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी व्यक्त केला.

कृष्णा नदी संवाद पदयात्रेच्या अनुषंगाने वारणाली येथे बैठक घेण्यात आली. या वेळी नदी समन्वयक डॉ. रवींद्र व्होरा, कृष्णा व तीळगंगा नदी समन्वयक डॉ. मनोज पाटील, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी एन. एस. अवताडे, पाटबंधारे विभागाच्या सहायक अभियंता योगिता थोरात, सहायक अभियंता मो. रा. गळंगे, उपविभागीय अधिकारी इस्लामपूर एस. एस. पाटील, सहायक अभियंता श्वेता दबडे, प्रदीप सुतार उपस्थित होते.

देवकर म्हणाल्या, की जिल्ह्यात कृष्णा नदीच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत कृष्णा नदी संवाद पदयात्रा निघेल. नागरिकांसमवेत संवादासाठी विविध गावांत बैठका होतील. दररोज सकाळच्या सत्रात सात किलोमीटर आणि दुपार सत्रात सात किलोमीटर पदयात्रा निघेल. नदी समन्वयक डॉ. मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली यात्रा निघेल.

दररोज दुपारी बारा ते दीड या वेळेत निवडक गावात संवाद होईल. नदीची सर्वंकष माहिती संकलित करण्यात येईल. हे अभियान यशस्वी करण्यासाठी, नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, शासकीय अधिकारी, कर्मचारी, कला क्षेत्रातील व्यक्ती, संत व धार्मिक व्यक्ती, शैक्षणिक संस्था या सर्वांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे.

डॉ. व्होरा व डॉ. पाटील यांनी नदी संवाद पदयात्रेबाबत महिती दिली. श्री. अवताडे यांनी नदी स्वच्छ व अमृतवाहिनी बनविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. एस. एस. पाटील यांनी प्रास्ताविक केले. योगिता थोरात यांनी आभार मानले.

बैठकांचे नियोजन असे ः

२१ जानेवारी - दुपारी तांबवे, सायंकाळी कोळे. २२ जानेवारी - दुपारी शिरटे, सायंकाळी बोरगाव. २३ जानेवारी - दुपारी दुधारी, सायंकाळी जुनेखेड. २४ जानेवारी - दुपारी नागठाणे, सायंकाळी - बुर्ली, २५ जानेवारी - दुपारी धनगाव, सायंकाळी भिलवडी. २६ जानेवारी - दुपारी ब्रह्मनाळ, सायंकाळी पद्माळे. २७ जानेवारी - दुपारी हरिपूर, सायंकाळी धामणी, २८ जानेवारी - दुपारी अर्जुनवाड, सायंकाळी म्हैसाळ.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Crop Damage : मुसळधार पावसामुळे भातपीक कुजण्याचा धोका

Zero Tillage: मातीची सुपीकता वाढवणारी शून्य मशागत खर्चाची बचत कशी करते

Crop Damage Survey : चाकूर तालुक्यात नुकसानीचे पंचनामे सुरू

bamboo Plantation : ​रत्नागिरीत १० हजार हेक्टरवर बांबू लागवड करणार

Agrowon Podcast: हिरवी मिरची टिकून; गव्हाला मागणी कायम, भेंडीला चांगला उठाव, कोथिंबीरचे भाव स्थिरावले, तर सूर्यफुलाच्या भावात मंदी

SCROLL FOR NEXT