Napier Grass  Agrowon
ॲग्रो विशेष

Napier grass : बहुवार्षीक चारापीक नेपियर लागवडीचे तंत्र

Livestock Fodder : बहुवार्षीक चारापिकापैकी नेपीयर हे गवतवर्गीय चारापिक जास्त उंच वाढणारे आणि जास्त फुटवे येणारे चारापीक आहे. नेपियर गवत पूर्वी हत्ती गवत म्हणून ओळखल जात होत.

Team Agrowon

Animal Care : गायी, म्हशीच संगोपन करताना सगळ्यात जास्त खर्च हा हिरव्या चाऱ्यावर होतो. हा हिरवा चारा वर्षभर मीळेलच असं नाही. त्यामुळे वर्षभर हिरवा चारा मिळत राहावा यासाठी चारा पिकाचे योग्य नियोजन करून ठेवाव लागत. त्यासाठी आपल्या शेतीतील काही भाग हा चारा लागवडीसाठी राखून ठेवलाच पाहिजे. लागवडीसाठी कमी पाण्यात आणि कमी दिवसात तयार होणाऱ्या चारा पिकाची निवड करावी.

चारा पिकापैकी गवत वर्गीय चारा पिकाची लागवड फायदेशीर ठरते. कारण गवतवर्गीय चारा पिके बहुवार्षीक असतात. या गवताची वरचेवर कापणी करुन जनावराची हिरव्या चाऱ्याची गरज भागविता येते. बहुवार्षीक चारापिकापैकी नेपीयर हे गवतवर्गीय चारापिक जास्त उंच वाढणारे आणि जास्त फुटवे येणारे चारापीक आहे.  नेपियर गवत पूर्वी हत्ती गवत म्हणून ओळखल जात होत. नेपियर गवताची एकदा लागवड केल्यानंतर दोन ते तीन वर्षांपर्यंत चाऱ्याच उत्पादन मिळत राहतं.

जमीन तयार करणे

नेपियर गवताच्या लागवडीसाठी एक खोल नांगरणी आणि २ ते ३ वेळा वखरणी करून जमीन तयार करावी. लागवडीपूर्वी उभ्या-आडव्या नांगरटी करून, दोन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करून घ्यावी. शेवटच्या कुळवणीच्या वेळी चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. या पिकाच्या लागवडीला उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. खत व पाणी व्यवस्थापन योग्य प्रमाणात दिल्यास या गवताची लागवड तीन वर्षांपर्यंत टिकते.

लागवड

सुपर नेपियर गवताची कांडी ४ फूट बाय २ फूट अंतरावर लावल्यास चाऱ्याच चांगल उत्पादन मीळतं.  ४ फुटाची सरी केल्यामुळे आंतरमशागती सोबतच चारापिकाला पाणी देणंही सोयीच होत.

खरीप हंगामात जून ते ऑगस्ट आणि उन्हाळ्यात फेब्रुवारी ते मार्च या महिन्यांत या गवताची लागवड ठोंबे मुळासह लावून करावी. तीन महिने वाढ झालेल्या गवताच्या खोडाचा जमिनीकडील दोन ते तीन डोळे असणाऱ्या कांड्या काढून लावल्यास त्या चांगल्या फुटतात. सरासरी दोन ठोंब्यांतील अंतर ९० बाय ६० सेंटीमीटर ठेवून लागवड केल्यास आंतरमशागत करण सोप जात.  लागवडीच्या वेळी माती परीक्षणानुसार हेक्‍टरी ५० किलो नत्र, ४० किलो स्फुरद, २० किलो पालाश द्याव. पुढे पीकवाढीचा जोम कायम राहण्यासाठी कापणीनंतर २५ किलो नत्र द्याव. गवताच्या सुरवातीच्या वाढीच्या काळात एक किंवा दोन खुरपण्या कराव्यात. त्यानंतर गरजेनुसार खुरपणी करावी. उन्हाळी हंगामात म्हणजे फेब्रुवारी ते मार्च महिन्यात लागवड केल्यास सुरवातीचे दोन व त्यानंतर आठ ते दहा दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. त्यामुळे गवताची चांगली वाढ होते.  

ही झाली नेपियर गवताची लागवड आणि व्यवस्थापनाविषयीची माहिती आता पाहुया गवताची कापणी केंव्हा करावी त्याबद्दल 

कापणी

नेपियर गवताची कापणी लागवडीपासून अडीच ते तीन महिन्यांनी करावी. कापणी जमिनीपासून साधारण १५ ते २० सेंटीमीटर उंचीवर करावी. त्यामुळे चांगले फुटवे फुटण्यास मदत होते. नंतरच्या कापण्या पीकवाढीनुसार सहा ते आठ आठवड्यांनी कराव्यात. वर्षभरातील सात ते आठ कापण्यांनंतर हिरव्या चाऱ्याच हेक्टरी २००० ते २५०० क्विंटल उत्पादन मिळत. अशाप्रकारे हिरव्या चाऱ्याच्या पुरवठ्यासाठी नेपियर चारा पीक लागवड फादेशीर आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

India US Trade Deal : भारत-अमेरिका व्यापार करारात मका, गहू, तांदूळ, दूध उत्पादकांना दिलासा; वाणिज्यमंत्र्यांनी दिली माहिती

Mumbai Mayor Election: मुंबईच्या महापौरपदासाठी रितू तावडे भाजपच्या उमेदवार, उपमहापौरपद शिंदेंच्या सेनेला

Maha Pashudhan Expo 2026: परळीत शुक्रवारपासून महापशुधन एक्स्पो

Post Harvest Management: वाहतुकीतील आर्द्रता, वायू नियंत्रण

Ear Tagging: वंशावळ तपासण्यासाठी इअर टॅगिंगचा आधार कसा घेता येतो?

SCROLL FOR NEXT