Team Agrowon
जनावरांना दिल्या जाणाऱ्या हिरव्या चाऱ्यामध्ये संकरित नेपियर हे एक महत्वाच चारा पीक आहे. वर्षाल ६ ते ७ कापण्या देणारं हे चारा पीक सर्व प्रकारच्या जमिनीत वाढते.
या पिकाचे तीन वाण महत्वाचे आहेत फुले जयवंत, फुले यशवंत आणि फुले गुणवंत. हे वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसीत केले आहेत.
फुले जयवंत म्हणजेच आरबीएन -१३ या वाणाच्या हिरव्या चाऱ्यात ऑक्झॉलिक आम्लाचे प्रमाण हे १.९१ टक्के, स्निग्ध पदार्थ २.३८ टक्के तसच एकूण पचनियता ६१.८ टक्के असते.
पानावर कूस कमी प्रमाणात असल्याने जनावरे हा चारा आवडीने खातात. चारा कापणीनंतर पुन्हा जोमाने लांब, भरपूर वाढतो.
पाने रुंद आणि फुटवे मऊ, लांब असतात. हे वाण वर्षभर कोणत्याही हंगामात लागवड करता येते. पहिली कापणी ९ ते १० आठवडे नंतरच्या कापण्या ३ ते ७ आठवड्यांनी करता येतात.
संकरित नेपीयरचे दुसरे महत्वाचे वाण आहे फुले यशवंत. हे वाण कापणीनंतर जोमाने वाढते. पाने जास्त लांब असतात आणि भरपुर फुटवे येतात. पाने मऊ, रुंद आणि कमी लव असणारे असतात.
फुले गुणवंत हे संकरित नेपियरचे तिसरे महत्वाचे वाण आहे. या वाणाचा चारा पालेदार, मऊ, लांब आणि रुंद पानाचा असतो.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.