Sugarcane Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Management : सुयोग्य व्यवस्थापनाने ऊस खोडव्यात चांगले उत्पादन

Sugarcane Production : ऊस पिकात सुयोग्य असे व्यवस्थापन केले तर ४ ते ५ खोडव्यांचे पीक घेणे व चांगले उत्पादन घेणे शक्य असल्याचे मत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे निवृत्त शास्त्रज्ञ एस. बी. माने पाटील यांनी व्यक्त केले.

Team Agrowon

Sangli News : ऊस पिकात सुयोग्य असे व्यवस्थापन केले तर ४ ते ५ खोडव्यांचे पीक घेणे व चांगले उत्पादन घेणे शक्य असल्याचे मत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे निवृत्त शास्त्रज्ञ एस. बी. माने पाटील यांनी व्यक्त केले. हिंगणगाव बुद्रुक (ता. कडेगाव) येथे डॉ. पतंगराव कदम सोनहिरा साखर कारखान्याने राष्ट्रीय कृषी दिनाचे औचित्य साधून आयोजित ऊस पीक परिसंवाद कार्यक्रमात एस. बी. माने पाटील बोलत होते.

या वेळी शेती अधिकारी प्रशांत कणसे, उपशेती अधिकारी वैभव जाधव सरपंच महेश कदम, सुरेश क्षीरसागर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. माने पाटील म्हणाले, ‘‘ऊस लागणीवेळी मशागत, बियाणे, खतांचा बेसल डोस, मजुरी खर्च, पिकातील आंतरमशागतीवर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो.

तुलनेत लागण ऊस तुटल्यानंतर खोडवा नियोजनबद्ध रीतीने ठेवल्यास कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्यास मदत होते. पाचट कुट्टी करून घेतल्यानंतर खोडव्यातील पाचटावर युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट टाकून घेतल्यानंतर चांगल्या प्रकारचे कंपोस्ट खत तयार होते. पाचट कुजविणारे डिकंपोझिंग कल्चरसुद्धा उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी उपयोग करून घ्यावा. पाचट ठेवल्याने पाण्याचे बाष्पीभवन टाळता येते.

मल्चिगंमुळे तण नियंत्रण होते. आंतरमशागत खर्चात बचत होते. तुटलेल्या उसाचे बुडखे ‘मल्चर’च्या साहाय्याने छाटल्यानंतर नवीन फुटवा लागण उसासारखा जमिनीतून निघत असल्याने जोमदार येतो.’’

फुटून आलेल्या खोडवा उसावर जैविक व रासायनिक अन्नद्रव्यांच्या ठरावीक अंतराने चार फवारण्या केल्या आणि खतांचा डोस पहारीने छिद्रे घेऊन दिल्यानंतर उसाची वाढ चांगल्या प्रकारे होते. या खोडवा उसाला नियमित पाणी, खतमात्रा दिल्यानंतर खोडव्याचे कमी खर्चात अपेक्षित उत्पादन येण्यास मदत झाल्याचेदेखील त्यांनी सांगितले. जोपर्यंत एकरी ४० टन खोडवा उत्पन्न निघत राहील, तोपर्यंत ४ ते ५ खोडवा पिके घेणे हे फायदेशीर आहे.’’ ऊस विकास प्रतिनिधी अविनाश येवले यांनी स्वागत केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT