Migrant Labor  Agrowon
ॲग्रो विशेष

Migrant Worker : सातपुडा पहाडातील मजूर कामाच्या शोधात सपाटीवर

Rural Employment : सद्यःस्थितीत सातपुडा पहाडात मजुरांसाठी काहीच काम नाही. या भागातील मजूर कामाच्या शोधात सपाटीवरील गावांमध्ये आले आहे.

Team Agrowon

Jalgaon News : सद्यःस्थितीत सातपुडा पहाडात मजुरांसाठी काहीच काम नाही. या भागातील मजूर कामाच्या शोधात सपाटीवरील गावांमध्ये आले आहे. सातपुडा पहाडातील पर्वतरांगांमध्ये वसलेल्या गावांमध्ये या दिवसात बागायती क्षेत्र नाही. मजुरांसाठी येणाऱ्या खरीप पेरणीपर्यंत कुठलेच काम नसल्याने मजुरांच्या कुटुंबावर स्थलांतराची वेळ आली आहे.

सध्या सातपुड्याच्या पहाडपट्ट्यात शुकशुकाट असल्याने हे मजूर घरीच असतात. त्यामुळे काम करून काहीतरी कमावता येईल हा उद्देश घेऊन हे मजूर आपले बिऱ्हाड डोक्यावर घेऊन सपाटीवरील गावांमध्ये दोन-तीन महिन्यांसाठी येत असते.

सद्यःस्थितीत खानदेशातील अक्कलकुवा, खापर, तळोदा, शहादा, शिरपूर, चोपडा, यावल, भुसावळ, मुक्ताईनगर या सातपुडा लगत असलेल्या तालुक्यांच्या उत्तर सिमेकडील पर्वत रांगांमधील गावांमध्ये असलेले मजूर सध्या मिळेल त्या कामासाठी सपाटीवरील गावांमध्ये आलेले आहेत.

मजुरांकडून सध्या कांदा काढणी, मका कापणी व काढणी, ज्वारी, बाजरी कापणी, खतांची वाहणी, मूग तोडणी, कडबा कुट्टी वाहने, भुईमूग उपटणी यासह शेती तयार करणे यासह यावलकडील भागात केळी पिकातील कामे व अन्य मिळतील ती कामे या मजुरांकडून केली जात आहेत.

त्यांना रोख रकमेसह ज्वारी बाजरी मिळत असल्याने पावसाळ्यातील खाण्यापिण्याची सोयही होणार आहे. हे मजूर सध्या ठरावीक रकमेवर किंवा रोजंदारीने काम करत असून, त्यांना दिवसाकाठी अडीचशे ते चारशे रुपये रोज मिळत असल्याने पावसाळ्यातील खर्चाची तरतूद होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर उन्हाळाही पार पडणार आहे. त्यामुळे सपाटीवरील बऱ्याच भागात आदिवासी भागातील मजूर येऊन काम करत असल्याचे दिसून आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT