Wild Animal Agrowon
ॲग्रो विशेष

Wildlife Attack : बुलडाण्यात वन्यजीवांचा धुमाकूळ ; शेतकऱ्यांची चिंता वाढली

Wild Life Rampage : सध्या शेतशिवारात हंगामाची कामे सुरू असून वन्यप्राणी अचानक हल्ले करीत असल्याने भीतीसदृश परिस्थिती निर्माण होत आहे.

Team Agrowon

Buldana News : जिल्ह्यात गेल्या काही काळापासून वन्यप्राण्यांचे हल्ले, वावर वाढत चाललेला आहे. दोन दिवसांत झालेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये शेळ्यांच्या मृत्यूसह एक महिला हल्ल्यात जखमी झाल्याचे समोर आले आहे. सध्या शेतशिवारात हंगामाची कामे सुरू असून वन्यप्राणी अचानक हल्ले करीत असल्याने भीतीसदृश परिस्थिती निर्माण होत आहे.

हल्ल्यात महिला जखमी

शेतात तुरीची सोंगणी करीत असताना एका अस्वलाने ३५ वर्षीय महिलेवर हल्ला केल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी घडला. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून त्यांना उपचारासाठी बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेऊन जखमी महिलेची भेट घेतली. चिखली तालुक्यातील डोंगरशेवली येथील रहिवासी अश्विनी विनोद सावळे (वय ३२) गावाला लागून असलेल्या आपल्या शेतात गेल्या होत्या. तूर सोंगणी करीत असताना तेथे दबा धरून बसलेल्या अस्वलाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला.

अश्विनी सावळे यांचा आवाज ऐकून आजूबाजूच्या शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी त्यांच्या मदतीला धाव घेतली. शेतकऱ्यांचा ओरडण्याचा आवाज येत असल्याने अस्वल तिथून पळून गेला. या हल्ल्यात सावळे यांना गंभीर दुखापत झाली आहे. नातेवाइकांनी तत्काळ त्यांना बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

बिबट्याच्या हल्ल्यात मोताळ्यात १० शेळ्या ठार

मोताळा तालुक्यातील बिबट्याचा वावर वाढलेला आहे. या तालुक्यात पोखरी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात १० शेळ्या ठार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. यापूर्वी दोन दिवसाआधी वरूड शिवारात दोन शेळ्या बिबट्याने ठार केल्याची घटना घडली होती. आता पोखरी येथील घटनेमुळे शेळीपालकाचे लाखावर नुकसान झाले आहे.

मोताळा तालुक्यातील किन्होळा येथील शेतकरी भास्कर पंढरी गवई यांची पोखरी शिवारात शेती आहे. त्यांनी या शेतातील वाड्यात शेळ्या बांधून ठेवल्या होत्या. अचानक बिबट्याने या वाड्यातील बकऱ्यांवर हल्ला केला. या घटनेत १० शेळ्या ठार झाल्या आहेत. यातील काही बकऱ्यांचा बिबट्याने फडशा पाडला.

तर, काही जखमी होऊन मृत्युमुखी पडल्या. ही घटना दोन दिवसांपूर्वी झाल्याचे उघड झाले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या घटनेमुळे परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे. वन विभागाने संबंधित शेतकऱ्याला शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून द्यावी. तसेच सदर बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Heatwave: नांदेडला १३ एप्रिलपासून तापमानाचा पारा ४० अंशांवर

Crop Insurance : सुधारित पिक विमा योजनेमुळे शेतकरी भरपाईपासून वंचित?

Mumbai Pune Missing Link Project: मुंबई- पुणे प्रवासाचा वेळ ३० मिनिटांनी कमी होणार, 'मिसिंग लिंक' खुला

Fertilizer Shop License Suspension: तीन कृषी केंद्रांचे परवाने रद्द, तर एकवीस निलंबित

India Rainfall Forecast: मे महिन्यात अधिक पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT