E -Pik Survey App agrowon
ॲग्रो विशेष

E -Pik Survey App : ई-पीक पाहणी अॅप नव्या रूपात; तांत्रिक दुरुस्ती केल्याने रब्बीची पिकाची नोंदणी होणार सोपी

Rabi Crop Registration : शंभर टक्के शेतकऱ्यांकडूनच ई-पीक पाहणी व्हावी या हेतूने प्रत्येक गावस्तरावर आता त्यांच्या मदतीसाठी व प्रशिक्षणासाठी सहायक देण्यात येणार आहेत.

sandeep Shirguppe

E Pik Survey App : ई-पीक पाहणीचे अॅप आता नव्या रूपात आले आहे. त्यात तांत्रिक दुरूस्ती करून विविध सुविधा उपलब्ध केल्या आहेत. शंभर टक्के शेतकऱ्यांकडूनच ई-पीक पाहणी व्हावी या हेतूने प्रत्येक गावस्तरावर आता त्यांच्या मदतीसाठी व प्रशिक्षणासाठी सहायक देण्यात येणार आहेत. यामुळे शेतकरी आणि तलाठी यांच्यात होणारा समन्वयाचा अभाव आता कमी होणार आहे.

शेतकऱ्यांचे अवघड काम सोपे करण्यासाठी सातबाऱ्यावर पीक नोंदीची कार्यवाही ऑनलाईन केली आहे. ई-पीक पाहणी अॅपद्वारे ही कार्यवाही करण्याची सक्ती आहे. राज्य शासनाकडून अॅपची निर्मीती केली होती, यामध्ये अनेक त्रुटी होत्या यात आता बदल करण्यात आला आहे.

या अॅपमधूनच शेतकऱ्यांनी पीक पाण्याची नोंद करायची आहे. परंतु, अॅपद्वारे नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी तलाठी करायचे. आता केंद्र शासनाच्या सूचनेनुसार अॅपमध्ये अनेक तांत्रीक दुरुस्ती करून नवीन रूपात ‘ई-पीक पाहणी डीसीएस (डिजिटल क्रॉप सर्व्हे)’ हे अॅप कार्यान्वित केले आहे.

तसेच आता तलाठ्यांवरील भार शासनाने हलका केला असून, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रत्येक गावात कोतवाल, ग्रामरोजगार सेवक, आशा सेविका किंवा मानधनावर काम करणाऱ्या मनुष्यबळाला सहायक नेमण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी करतानाच हे सहायक शेतकऱ्यांनाही प्रशिक्षित करतील. त्यानंतर शेतकऱ्यांनीच अॅपचा वापर करायचा असून, प्रत्येकवेळी सहायक मिळणार नाहीत.

शंभर टक्के ई-पीक पाहणी शेतकऱ्यांकडून होणे अपेक्षित असल्याने सहायकाकडून प्रशिक्षित होण्याशिवाय शेतकऱ्यांना आता पर्याय राहणार नाही. पीक पाणी नोंदीनुसारच पाक विमा, पीक कर्ज, नैसर्गिक आपत्तीमधील मदत, एमएसपी अंतर्गत पिकांची विक्रीचे फायदे शेतकऱ्यांना मिळणार आहेत.

काय आहेत नव्या सुविधा?

- सात-बारा उताऱ्यावर नोंदणी

- पाहणी अपलोड केल्यापासून ४८ तासांत दुरुस्ती किंवा नष्ट करता येणार

- किमान आधारभूत किंमत (एमएसपी) अंतर्गत विक्रीसाठी पीक नोंदणीची सुविधा

- गावातील संपूर्ण खातेदारांची पीक पाहणी पाहता येणार

- पड, बांधावरील झाडे, पिकांची नोंदणी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

Washim Drought Survey: वाशीम जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थितीची तातडीने पाहणी करा : दत्तात्रय भरणे

Rain Update: पश्चिम विदर्भात पावसाच्या सरी; खरीपाचे भवितव्य अधांतरी

El Nino Impacts: 'एल निनो'चं संकट; शेतकऱ्यांना मदत मिळणार, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वालांची माहिती

SCROLL FOR NEXT