PM Kisan Agrowon
ॲग्रो विशेष

PM Kisan : पीएम किसान अंतर्गत ३३ हजारांवर शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रलंबित

E-KYC Process : पंतप्रधान किसान सन्मान निधी - पी.एम. किसान योजनेअंतर्गत अद्याप ई-केवायसी प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांना सोमवारपर्यंत (ता. २५) अंतिम मुदत आहे.

Team Agrowon

Parbhani News : परभणी जिल्ह्यात पंतप्रधान किसान सन्मान निधी - पी.एम. किसान योजनेअंतर्गत अद्याप ई-केवायसी प्रलंबित असलेल्या शेतकरी लाभार्थ्यांची संख्या ३३ हजार ९३ व बँक खाते आधार संलग्न प्रलंबित असलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या ४ हजार ६१५ एवढी आहे.

या योजनेची अनुदान रक्कम बँक खात्यावर जमा होण्यासाठी  पात्र लाभार्थ्यांना ई- केवायसी आणि बँक खाते आधार संलग्न करणे बंधनकारक आहे. त्यासाठी सोमवारी (ता. २५) अंतिम मुदत आहे.

केंद्र शासनाकडून मागील २ वर्षांपासून पीएम किसान अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये अनुदान दिले जात आहे. केंद्राप्रमाणेच राज्य शासनाकडूनही नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबविली जात आहे.

केंद्राप्रमाणेच राज्य शासनाचे देखील २ हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे. परंतु वारंवार सूचना व मुदतवाढ देऊनही जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांनी आपले ई- केवायसी करून घेतलेले नाही. ई-केवायसी नसेल त्यांच्या खात्यावर अनुदान जमा होणार नाही.

पीएम किसान सन्मान निधी या वेबसाइटवर फार्मर कॉर्नर या टॅबमध्ये किंवा पीएम किसान ॲपवर ओटीपीद्वारे लाभार्थ्यांना स्वतः ई -केवायसी प्रमाणीकरण मोफत करता येईल. ग्राहक सेवा केंद्रावर केवायसी प्रमाणीकरण बायोमेट्रिक पद्धतीने करता येईल.

पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी तत्काळ सोमवार (ता. २५)पर्यंत ई- केवायसी व आधार सीडिंग करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर. बी. हारणे, सर्व तालुका कृषी अधिकारी यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा 344.74 कोटीं निधी वळवला

Silkworm Monsoon Care: पावसाळ्यात रेशीम अळी संगोपन करताना घ्यावयाची काळजी

Kisan Credit Card: किसान क्रेडिट कार्ड : मत्स्य व्यवसायासाठी आर्थिक सक्षमीकरण

Monsoon Parasite Control: पावसाळ्यातील परजीवी कीटकांचे एकात्मिक व्यवस्थापन

Animal Health Protection: पशू, मानव आरोग्याचे संरक्षण

SCROLL FOR NEXT