Onion Rate Online agrowon
ॲग्रो विशेष

Onion Rate Online : राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांद्याचे ई-लिलाव सुरू करावेत

E Auction Onion : कांद्याची कवडीमोल भावाने होणारी विक्री टाळण्यासाठी आणि स्पर्धात्मक भाव मिळण्यासाठी राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांद्याचे ई-लिलाव सुरू करावेत.

sandeep Shirguppe

Onion E Auction : कांद्याची कवडीमोल भावाने होणारी विक्री टाळण्यासाठी आणि स्पर्धात्मक भाव मिळण्यासाठी राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांद्याचे ई-लिलाव सुरू करावेत, त्यासाठी केंद्र सरकारच्या ई-नाम किंवा ई-ट्रेडिंग योजनेची अंमलबजावणी सुरू करावी, अशी महत्त्वाची शिफारस कांदा प्रश्नावर अभ्यास करण्यासाठी स्थापन केलेल्या सुनील पवार समितीने राज्य सरकारकडे केली आहे.

कांदा काढणीच्या हंगामात कांदा उत्पादक पट्ट्यातील बाजार समित्यांमध्ये बेसुमार आवक होते. शेतकऱ्यांकडे साठवणुकीची व्यवस्था नसते. कांदा सडून जाण्यापेक्षा मिळेल त्या किंमतीला विकावा आणि आर्थिक निकड भागवावी म्हणून शेतकरी कांद्याची विक्री करतात. मागणीच्या तुलनेत आवक वाढल्याच्या स्थितीचा व्यापारीही फायदा घेतात. त्यामुळे कांदा कवडीमोल होतो. या अनागोंदीच्या स्थितीत ई-नाम योजना फायद्याची ठरेल.

राज्यातील ११८ बाजार समित्यांमध्ये ई-नाम व्यवहार सुरू झाले आहेत. त्यासह अन्य बाजार समित्यांनी ई-नाम योजनेअंतर्गत कांदा खरेदी-विक्री व्यवहार करावेत. जेणेकरून देशाच्या अन्य भागातून मागणी वाढून दर स्थिर राहतील किंवा स्पर्धात्मक दर मिळतील.

शिवाय ई-नाममुळे लिलाव प्रक्रिया पारदर्शक होईल. शेतकरी, अडते, व्यापाऱ्यांमध्ये समन्वय साधला जाईल, तसेच रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल, अशा शिफारसीही समितीने केल्या आहेत.

काढणीच्या काळात निर्यात करा

राज्यात कांदा काढणीच्या हंगामात आणि प्रामुख्याने साठवणूक योग्य कांदा नसल्याच्या काळात कांदा सडून जाण्यापेक्षा किमान शेजारील देशांना कांदा निर्यात करण्याची परवानगी केंद्र सरकारने द्यावी. कांदा निर्यातीबाबत परिस्थितीनिहाय धोरण ठरवावे. दीर्घकालीन धोरण आखताना परदेशाची बाजारपेठ हातची जाऊ नये, याची काळजी घ्यावी. सध्या निर्यात बंदीमुळे आखाती देशांतील आपली हक्काची बाजारपेठ अन्य देशांनी काबीज केली आहे, असेही समितीने निरीक्षण नोंदविले आहे.

निर्यातीतील अडथळे दूर करा

देशातून सर्वाधिक कांदा निर्यात बांगलादेशाला होते. मात्र सध्या निर्यात बंद आहे. बांगलादेशाने आयातकर लावला आहे. शिवाय रेल्वेने कांदा निर्यातीसाठी जास्तीच्या सुविधांची गरज आहे. नेपाळ, श्रीलंकेला आपला कांदा जातो; पण कोरोनानंतर ही निर्यात अडचणीत आली आहे. श्रीलंका आणि नेपाळची आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळे पाठविलेल्या मालाचे पैसे येण्याची भीती व्यापाऱ्यांना आहे. शिवाय शेजारील आणि मित्र देशांसोबत रुपयांत आर्थिक व्यवहार व्हावेत, अशी शिफारसही समितीने केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT