Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain : अवकाळीच्या नुकसानीमुळे पिकांत सोडली जनावरे

Crop Damage : वाशीम जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे साडेपाच हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

Team Agrowon

Risod News : वाशीम जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे साडेपाच हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त पिकांत जनावरे सोडण्याची वेळ आली असून त्यांचा सध्या कोणीही वाली नसल्याची स्थिती आहे.

उन्हाळी पिकांमधून कसर भरून निघेल म्हणून शेतकऱ्यांनी यावर्षी विविध पिकांची लागवड केली. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यात या वर्षी साडेपाच हजार हेक्टरवर उन्हाळी मूग, भुईमूग, उन्हाळी ज्वारी, मका, तीळ यासह कांदा बीजोत्पादनाचे क्षेत्र आहे.

मार्चच्या शेवटच्या आठवड्यात झालेला अवकाळी पाऊस व त्यानंतर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातील वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे उन्हाळी पिकांना मोठा तडाखा बसला. ही सर्व पिके जमीनदोस्त झाली. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढवलेले आहे. शेतकऱ्यांनी पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी शासनाकडे केली आहे.

सध्या लोकसभा निवडणुकीमुळे वातावरण तापलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्‍या प्रश्‍नांकडे लक्ष द्यायला कुणालाही वेळ नाही.

वादळवाऱ्यासह गारपिटीने उन्हाळी पिकांचे नुकसान झाले आहे. पंचनाम्याचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. नुकसानीचा एकत्रित अहवाल तयार करून लवकरच पाठविला जाईल.
प्रतिक्षा तेजनकर, तहसीलदार, रिसोड
या वर्षी पाच एकरांत उन्हाळी मुगाची पेरणी केली होती. पाऊस व गारपीट झाल्यामुळे सर्व पीक जमीनदोस्त झाले आहे. त्यामुळे शेतामध्ये गुरे व शेळ्या सोडल्या. झालेला सर्व खर्च वाया गेला.
नितीन खडसे, शेतकरी, शेलूखडसे, जि. वाशीम

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: तूर दरात वाढ, आले आवकेत घट, बटाटा दरात घसरण, भेंडी दरात नरमाई तर मेथीचे भाव टिकून

Sericulture Award 2026: ‘उत्कृष्ट रेशीम उद्योग घटक’ पुरस्कारासाठी गिते दाम्पत्याची निवड!

Bhajani Mandal Grant: भजनी मंडळांना २५ हजार अनुदान; सदस्य, कार्यक्रम संख्येच्या निकषांत बदल, सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Rainfall Deficit: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३० मंडलांत पावसाचा खंड

Crop Stress: पावसाची मोठी उघडीप? पिकाचा ताण कमी करण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी

SCROLL FOR NEXT