Betel Leaf Agrowon
ॲग्रो विशेष

Betel Leaf : खाऊच्या पानांची आवक कमी असल्याने दर टिकून

Betel Leaf Market Rate : सांगली जिल्ह्यातील यंदाचा खाऊच्या पानांचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. हंगामाच्या प्रारंभापासून बाजारात पानांची आवक कमी असल्याने पानांचे दर टिकून राहिले आहेत.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : सांगली जिल्ह्यातील यंदाचा खाऊच्या पानांचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. हंगामाच्या प्रारंभापासून बाजारात पानांची आवक कमी असल्याने पानांचे दर टिकून राहिले आहेत. त्यामुळे यंदा पानांना चांगले दर मिळाल्याने पान उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील बेडग, आरग, नरवाड, यासह पूर्व भाग हा भाग पान मळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. या भागातील पानांची विक्री पंढरपूर, सोलापूर, कोकण यासह अन्य ठिकाणी विक्री होतात. जानेवारी ते मार्च ही तीन महिने विश्रांती देऊन मार्चनंतर पुन्हा नवीन हंगाम धरण्याची तयारी शेतकरी करतात. एप्रिल महिन्यापासून नवीन पानांची खुडणी सुरू होते.

वास्तविक पाहता, यंदा उन्हाळी पावसाने दडी मारली. त्यातच मॉन्सूनचा पाऊस लांबणीवर पडला. तसेच पानांना पोषक वातावरण नव्हते. पुरेसा पाऊस नसल्याने अपेक्षित फुटवा निघाला नाही. यासाऱ्यामुळे वेलींना पानांची संख्या झाली असून उत्पादनात ४० टक्क्यांनी घट झाली.

यंदा अपुरा पाऊस यामुळे पानांचे उत्पादन घटले. पण बाजारात पानांची मागणी आणि उठाव होत असल्याने दर टिकून राहिले आहेत. दसरा आणि दिवाळीच्या दरम्यान दरात वाढ होईल, अशी आशा आहे.
भाऊसो नागरगोजे, पान उत्पादक शेतकरी, नरवाड, ता. मिरज

दरम्यान, बाजारात पानांच्या आवकेत मोठी घट झाल्याने जुलै महिन्यात खाऊच्या पानांचे दर २५ टक्क्यांनी वाढले. परंतु जुलै महिन्यात वाढलेले दर फार काळ टिकले नाही. बाजारात मागणी कमी झाल्याने दर कमी झाले असे पान उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले. त्यानंतर श्रावण, गणपती, या सणांत अधिक मागणी असते.

त्यानुसार शेतकऱ्यांनी पानांच्या खुड्याचे नियोजन केले. श्रावण आणि गणपतीच्या दरम्यान पानांच्या मागणीत वाढ झाली असल्याने पुन्हा पाच ते दहा टक्क्यांनी दरात वाढ झाली. गेल्या वीस ते पंचवीस दिवसांपासून बाजारात पानांचे दर टिकून आहेत. सध्या फाफडा पानाला एका डागाला (१२ हजार पाने) ३५०० ते ७००० तर कळी पानाला एका डागाला (१२ हजार पाने)१६०० ते ५००० असा दर मिळत आहे.

यंदाचा खाऊच्या पानांचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. डिसेंबर महिन्यात हंगाम संपतो. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत पानमळ्यांना विश्रांती देऊन पुन्हा त्याची उतरण केली जाणार आहे. त्यानंतर नवा हंगाम सुरू होईल. यंदा हंगामाच्या प्रारंभापासून पानांचे एकदाच दर कमी झाले. त्यानंतर पानांच्या दरात वाढ झाली असून दर टिकून असल्याने पान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दसरा आणि दिवाळीत पानांच्या दरात वाढ होईल, अशी शक्यता पान उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT