Maize Agrowon
ॲग्रो विशेष

Maize Crop Loss : बुलडाणा जिल्ह्यात पावसामुळे मक्याला फुटले कोंब

Heavy Rain Crop Damage : बुलडाणा जिल्ह्यात या खरीप हंगामात लागवड झालेल्या सोयाबीन, कपाशी पाठोपाठ मक्याच्या पिकाचेही सततच्या पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे.

Team Agrowon

Buldana News : बुलडाणा जिल्ह्यात या खरीप हंगामात लागवड झालेल्या सोयाबीन, कपाशी पाठोपाठ मक्याच्या पिकाचेही सततच्या पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. शेतामध्ये पावसाचे पाणी सातत्याने साचल्याने सोंगणी केलेल्या मक्याच्या कणसांमधून कोंब बाहेर निघू लागले आहेत. शिवाय तयार होत असलेल्या मक्याचा दर्जा खालावला आहे. मालामध्ये ओलावा जास्त असल्याने बाजारातील दरही घसरले आहेत.

जिल्ह्यात खरीप हंगामात १० हजार हेक्टरपेक्षा अधिक लागवड झाली होती. पीक काढणीच्या काळात पावसाने घातलेला धुमाकूळ मक्याला बाधक ठरला. नांदुरा, मलकापूर, बुलडाणा, चिखली, मेहकर, खामगाव व इतरही तालुक्यांत खरिपात मक्याची लागवड केली जाते.

सप्टेंबरमध्ये मका काढणी सुरू झाली. टप्प्याटप्प्याने हंगाम पुढे जात असतानाच पावसाने बाधा निर्माण केली. आता दसऱ्याच्या काळात सतत पाऊस झाल्याने सोंगणी केलेला मका मोठ्या प्रमाणात ओला झाला होता. यामुळे कणसांना कोंब फुटल्याचेही प्रकार समोर आले आहेत.

बाजारातील दरही कमी

खरीप हंगामात मक्याची मलकापूर बाजार समितीत मोठी आवक होत असते. सध्या या बाजारात मक्याचा सरासरी दर १७०० रुपयांपर्यंत घसरलेला आहे. तर, कमाल दर २०२५ रुपयांपर्यंत मिळतो आहे. मालात अधिक ओलावा तसेच दर्जा घसरल्याने मक्याचे दर कमी झाले आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना अधिक सहन करावे लागते आहे. काही दिवसांआधी मक्याने दरांमध्ये मोठी झेप घेतली होती. परंतु आता हंगाम सुरू होताच दर घसरले आहेत. सरासरी भाव अवघा १७०० रुपयांपर्यंत शेतकऱ्यांच्या हातात पडतो आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Purchase Investigation : कांदा खरेदीची केंद्राकडून चौकशी सुरू

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

Cotton Moisture Content : कापसातील ओलाव्यासाठी हवा १५ टक्क्यांचा निकष

Yellow Peas Import : पिवळा वाटाणा आयात पोहोचली १२.५४ लाख टनांवर

Maharashtra Assembly Election Counting : आज मतमोजणी; ८ वाजता सुरुवात

SCROLL FOR NEXT