Animal Fodder agrowon
ॲग्रो विशेष

Animal Fodder : पाण्याअभावी ओला चारा वाढलाच नाही, जनावरांच्या ओल्या चाऱ्यासाठी शेतकऱ्यांची वणवण

Kolhapur Fodder Shortage : लाखमोलाचे पशुधन सांभाळण्यासाठी पशुपालकांचीही वणवण भटकंती सुरू झाली आहे.

sandeep Shirguppe

Fodder Shortage Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या काही दिवसात वळवाच्या पावसाने काहीसा दिलासा मिळाला आहे. परंतु जिल्ह्यातील पशुपालक जनावरांना ओला चारा म्हणून प्रामुख्याने उसाच्या पाल्याचा उपयोग होत आहे. परंतु पाण्याअभावी जिल्ह्यातील अनेक तालुक्यात उसाची वाढ झालीच नसल्याने ओला चारा मिळणे कठीण होत चालले आहे.

जनावरांना ओल्या चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पशुपालकांना ओल्या चाऱ्यासाठी धावपळ करावी लागत आहे. लाखमोलाचे पशुधन सांभाळण्यासाठी पशुपालकांचीही वणवण भटकंती सुरू झाली आहे.

शेतकरी ऊसशेतीला जोडधंदा म्हणून दुभती जनावरे पाळून मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय करतात. अनेक बेरोजगारांसाठी हा प्रमुख व्यवसाय बनला आहे. जनावरांच्या संगोपन व दूधवाढीसाठी ओला चारा महत्त्वाचा घटक असतो. शेतकरी उसाचा पाला व वाढे, गाजर गवताचा प्रामुख्याने ओला चारा म्हणून वापर करतात.

पावसाळ्यात डोंगरी गवताचा ओला चारा म्हणून उपयोग करतात. दिवाळीनंतर साखर कारखाने सुरू होतात. यावेळी जनावरांना ओला चारा म्हणून उसाचे वाढे मुबलक प्रमाणात उपलब्ध होते. जनावरांना ओल्या चाऱ्याची सोय व्हावी या उद्देशाने गावागावांत स्थानिक पातळीवर पशुपालक ऊसतोडणीचे काम करत असतात.

यंदा गळीत हंगाम लांबणीवर पडला. पशुपालकांना ओला चारा म्हणून उसाचे वाढे मिळत होते. मात्र, गळीत हंगाम जवळपास संपला आहे, त्यामुळे वाढे संपले आले आहे. जनावरांना ओला चारा मिळेनासा झाला आहे. यामुळे ओल्या चाऱ्याचे दर गगनाला भिडले आहेत. ओला मका व गाजर गवत चढ्या दराने विकत घ्यावे लागत आहे. ओल्या चाऱ्याच्या कमतरतेमुळे जनावरे कमी दूध देत आहेत. याचा फटका दूध उत्पादकांना बसत आहे.

सध्या जनावरांच्या ओल्या चाऱ्याचेही मोठ्या प्रमाणात दर वाढले आहेत. एका गवताच्या पेंडीचे दर सध्या २५ रुपयांवर गेले आहेत.

ओल्या चाऱ्याअभावी जनावरांचे दूध कमी झाले. जनावरांना ओल्या चाऱ्याची कमतरता भासत असल्यामुळे दुसऱ्याच्या शेतातील मका विकत घेत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात पहायला मिळत आहे. काही ठिकाणी सरीवर पैसे दिले जात आहेत तर काही ठिकाणी गुंठेवारीवर मक्याचे पीक विकले जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT