Sugarcane Farm Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Farming : पाण्याअभावी ऊस लागवडी खोळंबल्या ; ऑक्टोबरअखेर फक्त २८ टक्के लागण

Sugarcane Planting Season : दा पुरेशा पावसाअभावी आडसाली व पूर्व हंगामी ऊस लागवडी खोळंबल्याचे चित्र आहे.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : यंदा पुरेशा पावसाअभावी आडसाली व पूर्व हंगामी ऊस लागवडी खोळंबल्याचे चित्र आहे. राज्यात सरासरीच्या दहा लाख ९५ हजार ७५ हेक्टरपैकी तीन लाख आठ हजार ४६० हेक्टर म्हणजेच २८ टक्के क्षेत्रांवर ऊस लागवडी झाल्या आहेत.

त्यातच ऑक्टोबरमधील कडक उन्हामुळे जमिनीत पुरेशी ओल नसल्याने ऊस लागवडीला चांगलाच फटका बसत आहे. त्यामुळे पुढील वर्षी साखर कारखान्यांसमोर उसाचा मोठा प्रश्‍न निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

पावसाळ्यात पुरेसा पाऊस न पडल्याचा फटका शेतकऱ्यांना बसू लागला आहे. यंदा पावसाअभावी खरीप हंगाम वाया गेल्याची स्थिती असताना पाण्याची उपलब्धता असलेल्या ठिकाणी शेतकऱ्यांनी ऊस लागवडीला प्राधान्य दिले. बहुतांश शेतकरी दरवर्षी आडसाली उसाच्या लागवडी १५ जुलै ते १५ ऑगस्ट या दरम्यान करतात.

पूर्व हंगामी उसाच्या १५ लागवडी ऑक्टोबर ते ३० नोव्हेबर या कालावधीत करतात. आत्तापर्यंत आडसाली उसाच्या लागवडी संपल्या आहेत. पूर्व हंगामी उसाच्या लागवडीचे अखेरचे दहा ते बारा दिवस उरले आहेत.

गेल्या वर्षी याच काळात ३ लाख ७७ हजार ३१९ हेक्टर म्हणजेच ३४ टक्के लागवड झाली होती. त्या तुलनेत यंदा तब्बल ६८ हजार ८५९ हेक्टरने लागवड घटली आहे. त्यातच आता अनेक ठिकाणी पाणी टंचाई भेडसावू लागल्याने ऊस लागवडी होण्याची शक्यता कमी झाली आहे. त्यामुळे लागवड फारशी वाढणार नसल्याचे चित्र आहे.

दरवर्षी शेतकरी आडसाली, पूर्वहंगामी, सुरू अशा तीन हंगामांत उसाच्या लागवडी करतात. आडसाली उसाच्या लागवडी केल्यानंतर साधारणपणे पंधरा ते सतरा महिन्यांनी ऊस कारखान्याला तोडणीस देतात.

यंदा ऊस आगार असलेल्या पुणे, नगर, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत ऊस लागवडी घटल्याचे चित्र आहे. मराठवाडा व विदर्भातही फारशा लागवडी झालेल्या नाहीत. त्यामुळे या भागात ऊस लागवडीची स्थिती बिकट होत चालली आहे.

माझ्याकडे एकूण ५० ते ५५ एकर शेती आहे. दरवर्षी उसाची २५ एकरांवर लागवड करतो. यंदा पुरेसा पाऊस पडला नाही. त्यामुळे लागवड कमी करून १३ ते १४ एकरांवर आणली आहे. येत्या काळात पाण्याची स्थिती बिकट होईल. त्यामुळे ऊस शेती कशी जगवायची, हा प्रश्‍न आहे.
- धनंजय आटोळे, ऊस उत्पादक, राजेगाव, ता. दौंड, जि. पुणे.

विभागनिहाय उसाचे सरासरी क्षेत्र व लागवड (हेक्टर)

विभाग---सरासरी क्षेत्र---प्रत्यक्ष लागवड---टक्के

छत्रपती संभाजीनगर---९६,९१९---३४,०७२---३५

कोल्हापूर---४,२०,५८९---६३,३५३---१५

नाशिक---४८,३९६---३१,१४४---६४

पुणे---३,४३,३९२---१,२५,७७०---३७

लातूर---१,६८,८९०---४३,३५८---२६

अमरावती---८,१७१---८,१५६---१००

नागपूर---७,२५८---२,५५४---३५

कोकण--१६११---५२---३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT