Agriculture Department Agrowon
ॲग्रो विशेष

Farmers Issue : कृषी विभागाचे नियंत्रण नसल्याने शेतकरी नडला जातोय

Team Agrowon

Nashik News : चांदवड तालुक्यात रब्बी हंगामातील कामांना वेग आला आहे. मात्र शेतीउपयोगी खते, औषधे, बी- बियाणे विक्री व्यवस्थेवर कृषी विभागाचे नियंत्रण नाही. काही कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या मनमानीमुळे शेतकरी नडला जात आहे, असे वास्तव चांदवड तालुका शिवसेनेने निवेदनाद्वारे मांडले आहे.

याबाबतचे निवेदन चांदवड तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला देण्यात आले आहे. मात्र येथे पूर्णवेळ तालुका कृषी अधिकारी नेसल्याने सध्या प्रशासकीय कामाला गती नसल्याची स्थिती आहे.

तालुका परिसरात कांदा लागवडीचा हंगाम असल्याने याच गोष्टीचा फायदा घेत खते, निविष्ठा शिल्लक असून देखील शेतकऱ्यांची अडवणूक होताना दिसून येत आहे. अनेक ठिकाणी युरियासारख्या खतांची मागणी केली तर त्या सोबत अनावश्यक वस्तूंची खरेदी करण्याकरिता शेतकऱ्यांना भाग पाडले जाते.

तसेच ई-पॉस मशिनवर खते किती शिल्लक दुकानात किती माल शिल्लक याची माहिती सूचना फलकावर नियमितपणे लावली जात नसल्याचे म्हटले आहे. तालुक्यात शेती कामांनी वेग घेतला असताना कृषी निविष्ठासाठी कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम काही विक्रेते करत असल्याचा शिवसेनेचे म्हणणे आहे.

याबाबत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शांताराम ठाकरे, चांदवड तालुकाप्रमुख नीलेश ढगे, बाळासाहेब जाधव, विजय पवार, युवा सेना तालुकाप्रमुख रोहित ठाकरे, ज्ञानेश्‍वर मांदळे, संभाजी गुंजाळ, अशोक आहेर, प्रकाश बनकर, अशोक जाधव, चांदवड कृषी अधिकारी कार्यालयास निवेदन देण्यात आले. याबाबत कृषी अधिकाऱ्यांनी लक्ष घालून वेळीच कारवाई करावी, अन्यथा शिवसेना पद्धतीने शेतकऱ्यांना न्याय देण्यात येईल, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.

शासकीय मार्गदर्शक सूचनांचे फलकच नाहीत

खतांची खरेदी करताना शेतकऱ्यांना प्रवृत्त केलं जात आहे. दुकानात परवानाधारक व्यक्ती दुकानात उपस्थित राहत नाही. परवाना कागदपत्रे आणि शेतकऱ्यांना इतर शासकीय मार्गदर्शक सूचनांचे फलक लावलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Harvesting : सोयाबीनची उंची वाढली, उत्पन्न कमीच

Irrigation Subsidy : सिंचन अनुदान रखडल्याने आर्थिक संकट

Sangli APMC : व्यापारी, हमाल वादावर तोडगा काढण्यासाठी समिती

Nuksan Bharpai : १८ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अवकाळी व अतिवृष्टिचा मदत निधी

Sugarcane FRP : ‘कादवा’कडून २७६४.२० रुपयांप्रमाणे ‘एफआरपी’

SCROLL FOR NEXT