Poultry Agrowon
ॲग्रो विशेष

Poultry Management : तापमान नियंत्रणासाठी पोल्ट्रीशेडवर कोरडा चारा, पाचट, पाण्याचे फवारे

Temperature Control : सध्या कसमादे परिसरातील तीव्र पाणीटंचाई आणि वाढत्या तापमानामुळे पक्ष्यांचे मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे.

Team Agrowon

Nashik News : सध्या कसमादे परिसरातील तीव्र पाणीटंचाई आणि वाढत्या तापमानामुळे पक्ष्यांचे मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. पक्ष्यांचे तीव्र उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून खामखेडा येथील शेतकरी प्रवीण शेवाळे व नितीन शेवाळे यांनी पोल्ट्री शेडवरती कोरडा चारा, पाचट व तापमान नियंत्रणासाठी पत्र्यावर स्प्रिंकलरने पाण्याची फवारणीची उपाययोजना केली आहे. यामुळे पक्ष्यांना गारवा मिळत असून तापमान नियंत्रित राहण्यास मदत होत आहे.

कसमादे भागात यावर्षी दुष्काळी परिस्थिती, त्यातच तापमानाने चाळिशी गाठली आहे. त्यामुळे शेती तसेच शेती पूरक व्यवसायांवर याचा मोठा परिणाम झाला आहे. एकेकाळी तेजीत चालणारे पोल्ट्री उद्योग दुष्काळी स्थितीमुळे संकटात सापडले आहेत.

यावर्षी दुष्काळामुळे पाणीप्रश्‍न गंभीर बनला आहे.प्यायलाही अनेक ठिकाणी पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे, अशा स्थिती पोल्ट्री वाचविण्याचे आव्हान असून त्यासाठी विविध मार्ग काढले जात आहेत.

सर्वत्र जलस्रोत कोरडे पडल्याने विकतचे पाणी आणूनही पाण्याची पुरेशी तजवीज होत नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी पोल्ट्रीशेड बंद आहेत तर अनेक व्यावसायिकांनी मार्चनंतर शेडमध्ये पक्षी टाकणे बंद केले आहे.

पोल्ट्री शेडच्या पत्र्यांवर पाचट अंथरल्याने व स्प्रिंकलरने पाणी सोडल्याने उन्हाची तीव्रता कमी होऊन पक्षांना उष्माघाताचा धोका कमी असतो.
-प्रवीण शेवाळे, पोल्ट्री व्यावसायिक.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mango Pulp Seized: भेसळयुक्त आंब्याचा गर नष्ट

Farmer Protest: आंबा पीक नुकसानभरपाईचा लाभ कोकणाप्रमाणे द्यावा

Konkan Krushi Vidyapeeth: कोकण कृषी विद्यापीठाला ‘ए’ दर्जाचे मानांकन

US Iran Conflict: इराण युद्धाचा शेवट जवळ आला आहे : डोनाल्ड ट्रम्प

Lonar Lake Issue: ‘लोणार’च्या समस्येवर तोडग्यासाठी समिती

SCROLL FOR NEXT