PDKV Shiwarferi Agrowon
ॲग्रो विशेष

PDKV Shiwarferi : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात शिवारफेरीला प्रारंभ

Shiwarferi Opening Update : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित तीन दिवशीय शिवारफेरीचे शुक्रवारी (ता. २०) मान्यवरांच्या उपस्थितीत उद्‌घाटन झाले.

Team Agrowon

Akola News : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित तीन दिवशीय शिवारफेरीचे शुक्रवारी (ता. २०) मान्यवरांच्या उपस्थितीत उद्‌घाटन झाले. पहिल्याच दिवशी विविध जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने शेतकरी या शिवारफेरीसाठी दाखल झाले होते. यामुळे विद्यापीठाचे पीक प्रात्यक्षिकाचे प्रक्षेत्र फुलून गेले.

कृषी विद्यापीठ स्थापना दिनानिमित्त दरवर्षी शिवार फेरीचे आयोजन केले जाते. यावर्षी तब्बल २० एकर प्रक्षेत्रावर एकाच ठिकाणी जिवंत पीक प्रात्यक्षिके साकारण्यात आली आहेत. कृषी विद्यापीठ निर्मित शेती विषयक तंत्रज्ञान तथा पीक वाणांचे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष अवलोकन करता यावे तसेच अत्याधुनिक शेती तंत्र आत्मसात करता यावे या उद्देशाने ही शिवार फेरी आयोजित करण्यात आली आहे.

उद्‌घाटनाला जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता अढाऊ, आमदार अमोल मिटकरी, आमदार किरण सरनाईक, ‘पंदेकृवि’चे कुलगुरू डॉ. शरद गडाख, ‘वनामकृवि’चे कुलगुरू डॉ. इंद्रमणी (परभणी), महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक रावसाहेब भागडे, ‘महाबीज’चे व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर, विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे (अमरावती), शंकर तोटावार (नागपूर), डॉ. हरिहर कौसडीकर यांच्यासह विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य व विद्यापीठाचे विभागप्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते.

या वेळी झालेल्या मार्गदर्शनात आमदार मिटकरी, आमदार सरनाईक, संगीता अढाऊ, डॉ. इंद्रमणी, डॉ. गडाख यांनी विद्यापीठाने निर्माण केलेले नवतंत्रज्ञान, पीकवाण या शिवारफेरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाहण्याची संधी मिळाली आहे. हवामान अनुकूल तंत्रज्ञान या ठिकाणी आहे. शेतकऱ्यांच्या ज्ञानात भर घालणारे प्रयोग येथे बघायला मिळतात, अशा प्रकारे सांगितले. प्रास्ताविक विद्यापीठाचे शिक्षण विस्तार संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे यांनी केले. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी केले.

मंत्र्यांची अनुपस्थिती

कार्यक्रमाच्या उद्‌घाटनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चव्हाण, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र यापैकी एकही मंत्री कार्यक्रमाला आले नाहीत. या बाबत शेतकऱ्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधींमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होत होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

Ujani Dam Water : उजनी धरणाचे आज रात्री सोळा दरवाजे उघडणार

Water Stock : सातपुड्यातील प्रकल्पांत जलसाठा वाढला

Agriculture Damage : कालवे वाहते राहिल्याने जमीन नापीक

SCROLL FOR NEXT