Drought  Agrowon
ॲग्रो विशेष

Drought Condition : नागपूर जिल्ह्यातील पाच महसुली मंडलांत दुष्काळसदृश परिस्थिती घोषित

Drought Update : नागपूर जिल्ह्यातील ११ महसुली मंडलांपैकी ज्या मंडलाचे विभाजन होऊन नवीन महसुली मंडल स्थापन करण्यात आलेली आहेत. त्या महसुली मंडलांत अद्याप पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आलेले नाही.

Team Agrowon

Nagpur News : नागपूर जिल्ह्यातील ११ महसुली मंडलांपैकी ज्या मंडलाचे विभाजन होऊन नवीन महसुली मंडल स्थापन करण्यात आलेली आहेत. त्या महसुली मंडलांत अद्याप पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आलेले नाही.

अशा सावनेर तालुक्यातील चिचोली (खापरखेडा), मौदा तालुक्यातील तारसा, रामटेक तालुक्यातील पवनी व हिवरा बाजार, कळमेश्वर तालुक्यातील गोंडखैरी या महसुली मंडलात दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करण्यात आली आहे.

दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करण्यात आलेल्या महसुली मंडलात उपाययोजना व सवलतीची तातडीने अंमलबजावणी करण्यात येणार आहे. जमीन महसुलात सुट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीज बिलात ३३.५ टक्के सूट.

शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयोअंतर्गत कामांच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याच्या पाणी पुरविण्यासाठी टॅंकर्सचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे या सवलती व उपाययोजना करण्यात देणार आहेत.

जून ते सप्टेंबर, २०२३ या कालावधीत ज्या महसुली मंडलांमध्ये सरासरी पर्जन्याच्या ७५ टक्क्यांपेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान ७५० मिलिमिटरपेक्षा कमी झाले आहे. अशा भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती बाबत निर्णय घेतला जातो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT