Drought Agrowon
ॲग्रो विशेष

Drought Condition : सातारा जिल्ह्यात वाढल्या दुष्काळाच्या झळा

Drought Situation : सातारा जिल्ह्यात फेब्रुवारीतच टंचाईच्या झळा वाढल्या आहेत. कण्हेर, उरमोडी धरणांत जेमतेम पाणीसाठा राहिला आहे.

विकास जाधव 

Satara News : सातारा जिल्ह्यात फेब्रुवारीतच टंचाईच्या झळा वाढल्या आहेत. कण्हेर, उरमोडी धरणांत जेमतेम पाणीसाठा राहिला आहे. त्यामुळे आता जिल्हा प्रशासनाची खरी कसोटी असून, आगामी काळात धरणातील शिल्लक पाण्यावरच आगामी टंचाईचे नियोजन करावे लागणार आहे. सध्या कोयनेत ६२.७४, कण्हेरमध्ये ३५.७५, उरमोडीत ३८.७५ टक्केच पाणी शिल्लक आहे. जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरने शंभरी पार केली आहे.

जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती सरकारने जाहीर केलेली आहे. सध्या माण, खटाव तालुक्यांत जिहे-कठापूरचे पाणी सोडण्यात आलेले आहे. त्यामुळे तेथे दुष्काळाची तीव्रता जाणवत नाही. पण ज्या तालुक्यात धरणे आहेत, तेथे आता टंचाईच्या झळा वाढल्या आहेत. येथील धरणांत जेमतेमच पाणी शिल्लक राहिले आहे.

मध्यंतरी कण्हेर व उरमोडी धरणातून दुष्काळी तालुक्यात पाणी सोडण्यात आले. त्यामुळे सध्या धरणात ३५ ते ३८ टक्केच पाणी शिल्लक राहिले आहे. धोम व बलकवडी धरणात ५४ टक्के पाणी आहे. तर कोयेत ६२.७४ टक्के पाणी शिल्लक आहे. यातून वीजनिर्मितीसह सिंचनासाठी पाणी सोडले जाणार आहे.

आगामी चार महिन्यांपर्यंत हे पाणी पुरवावे लागणार आहे. यातील बहुतांशी पाणी हे पिण्यासाठीच राखीव ठेवावे लागणार आहे. उरमोडी व कण्हेर धरणांतून दुष्काळी तालुक्याला पाणी सोडल्यामुळे सातारा, कोरेगाव तालुक्यांतील जनतेत संतापाची लाट निर्माण झाली आहे.

टॅंकरची संख्या वाढली

जिल्ह्यातील टंचाईत वाढ झाल्याने फेब्रुवारीतच टॅंकरची संख्या शंभर पार झाली आहे. पाच तालुक्यांतील ९५ गावे व ३२३ वाड्यावस्त्यांवरील एक लाख ७० हजार १३२ लोकांना १०१ टॅंकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. यामध्ये सर्वाधिक झळा माण तालुक्यात बसत असून ४७ टॅंकरने ३७ गावे व २४६ वाड्यावस्त्यांवरील ६२ हजार लोकांना पाणी पुरविले जात आहे. टंचाई वाढत असल्याने प्रशासनाकडून ३१ विहिरी व ४१ बोअरवेल संरक्षित पाण्यासाठी अधिग्रहण करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Fruit Drop: शुक्लकाष्ठ फळगळीचे!

Pimpalapur Farmer Death Assistance: पिंपळापूर येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबाची प्रशासनाकडून भेट; शासकीय योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT