Kukadi River Agrowon
ॲग्रो विशेष

Drought Crisis : ‘कुकडी’ कोरडी पडल्याने पारनेरच्या २० गावांमध्ये दुष्काळ

Water Scarcity : शिरूर व पारनेर तालुक्यांना वरदान ठरणारी कुकडी नदी गेल्या वीस दिवसांपासून कोरडी पडल्यामुळे, सुमारे २० गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

Team Agrowon

Pune News : शिरूर व पारनेर तालुक्यांना वरदान ठरणारी कुकडी नदी गेल्या वीस दिवसांपासून कोरडी पडल्यामुळे, सुमारे २० गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्याअभावी हातातोंडाशी आलेल्या कांद्याचे पीक सुकून गेल्याने शेतकरी वर्ग हतबल झाला आहे .

शिरूर तालुक्यातील बेट भागातून शिरूर-पारनेर तालुक्यांच्या सीमेवरून कुकडी नदी वाहते. या नदीवर ठिकठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधलेले असून त्यावरून शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन ५ किमीपर्यंत उपसा सिंचन योजना राबविल्या आहेत. या परिसरात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते.

सध्या कांदे पीक तीन ते साडेतीन महिन्यांचे झाले असून, अजून महिनाभर कांद्याला पाणी देणे आवश्यक आहे. गेल्या वीस दिवसांपासून नदीवरील सर्व बंधारे कोरडे पडले आहेत, तर विहिरींनीही तळ गाठला आहे. त्यामुळे पाण्यावाचून कांदा, डाळिंब ही पिके आता माना टाकू लागले आहेत.

कांदा पिकावर शेतकऱ्यांचे वर्षाचे आर्थिक गणित अवलंबून असते. मात्र, मोठ्या प्रमाणात खर्च करूनही शेवटी कांदा पीक पाण्यावाचून सुकून गेल्याने उत्पन्नावर मोठा परिणाम होणार आहे. नोव्हेंबर महिन्यात कुकडी पट्ट्यात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली होती, त्यातून शेतकरी सावरत नाही तोच पाणीटंचाईचे संकट कोसळल्याने परिस्थिती कठीण झाली आहे.

बेट भागातील जांबूत, शरदवाडी, वडनेर, माळवाडी, होनेवाडी शिनगरवाडी, म्हसे तर पारनेर तालुक्यांतील शिरापूर, चोंभूत, वडनेर, निघोज (कुंड), गाडीलगाव, गुणवरे, म्हसे हे बंधारे कोरडे पडले असून विद्युत पंप बंद आहेत. शेजारी कुकडी कालवा मात्र तीन किमी अंतरावरून भरून वाहत आहे. परिणामी परिसरातील जनतेची अवस्था ‘धरण उशाला अन् कोरड घशाला’ अशी झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT