ZP School Education Agrowon
ॲग्रो विशेष

ZP Marathi School : अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या पटसंख्येत घट

Rural Education : अहिल्यानगर जिल्ह्यात विद्यार्थी पटसंख्या वाढीसाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत मोठा खर्च केला जात असतानाही विद्यार्थ्यी जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत मात्र पटसंख्या कमी होत आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यात विद्यार्थी पटसंख्या वाढीसाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत मोठा खर्च केला जात असतानाही विद्यार्थ्यी जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत मात्र पटसंख्या कमी होत आहे. पाच वर्षांचा विचार केला तर अहिल्यानगर जिल्ह्यात पहिली ते इयत्ता आठवी पर्यंत २४ हजार ८८३ विद्यार्थी संख्या घटल्याचे स्पष्ट होत आहे.

यावर्षीची (२०२५-२६) विद्यार्थी संख्या निश्चित व्हायची आहे. मात्र घटत्या विद्यार्थी संख्येला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पाच वर्षांतील बाबीची चौकशी करून कारवाई करण्याची मागणीही होत आहे. जिल्हा परिषद शाळांत विद्यार्थ्यांची संख्या वाढण्यासाठी विविध उपाययोजना, उपक्रम राबवले जातात.

अहिल्यानगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद मराठी शाळांत मात्र विद्यार्थ्यांची प्रत्येक वर्षी पटसंख्या वाढण्याऐवजी कमी होत आहेत. पाच वर्षांत पहिले ते आठवी पर्यंतच्या वर्गात २४ हजार ८६३ विद्यार्थी संख्या कमी झाली आहे. २०२१-२२ या वर्षी मात्र ९ हजाराने विद्यार्थी संख्या वाढल्याचे दिसत आहे.

जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या का कमी होते? त्याला नेमके जबाबदार कोण? अशा बाबींच्या तळाशी जाणे गरजेचे असल्याचे मत ग्रामीण भागातील शिक्षणप्रेमी आणि पालक व्यक्त करत आहेत. पालकमंत्री, शिक्षणमंत्री यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांची कमी होणाऱ्या पटसंख्येबाबत गांभिर्याने घ्यावे.

जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,, जिल्हा शिक्षण अधिकारी (प्राथमिक) यांना ‘‘माझी शाळा मराठी शाळा’’ हे अभियान राबविण्यास कमी पडत असल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळे पाच वर्षांतील कामाची चौकशी करून शालेय पटसंख्या कमी होण्याला कारणीभूत असलेल्या आणि त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी,

अशी मागणी संभाजी दहातोंडे यांनी केली आहे. शिक्षण, मुख्याध्यापकांची ऑनलाइन कामे कमी करावेत, जिल्ह्यातील सर्व शाळांतील बैठका बंद कराव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ginger Turmeric Crops: आले, हळद पिकांसाठी आता संघर्ष करणार

Cyclone Ditwah: ‘डिटवाह’नं श्रीलंकेतील शेती उद्ध्वस्त; मत्स्यव्यवसाय, ग्रामीण उपजीविकेवर गंभीर परिणाम- एफएओ अहवाल

Rural Development: वसा गावातील नावीन्यपूर्ण उपक्रम अभिनंदनीय

Rabi Crop Loan: सांगली जिल्ह्यात रब्बीसाठी अवघे पाच टक्के कर्ज वितरण

Agrowon Podcast: कांदा दर टिकून, सोयाबीनमध्ये सुधारणा, कापूस दराला आधार, बाजरीचे दर टिकून तर पपईला मागणी

SCROLL FOR NEXT