Dr. Pravin Gedam Agrowon
ॲग्रो विशेष

Dr. Pravin Gedam : नाशिक विभागीय आयुक्तपदाचा पदभार डॉ. गेडाम यांनी स्वीकारला

Agriculture Commissioner Transfer : नाशिक विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे शुक्रवारी (ता.३१) निवृत्त झाल्याने त्यांच्या जागी कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची बदली झाली.

मुकूंद पिंगळे

Nashik News : नाशिक विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे शुक्रवारी (ता.३१) निवृत्त झाल्याने त्यांच्या जागी कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची बदली झाली. त्यांनी पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारताच गमे यांनी डॉ. गेडाम यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या वेळी त्यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.

डॉ. गेडाम हे आधी कृषी विभागाचे आयुक्त होते. अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांनी शुक्रवारी (ता. ३१) दुपारी त्यांच्या बदलीबाबत आदेश काढले होते. त्यानुसार डॉ. गेडाम यांनी सूत्रे स्वीकारली. नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. देशभरातील भाविक त्यानिमित्त नाशिकमध्ये येत असल्याने कुंभमेळ्याच्या नियोजनाकडे सर्वांचे लक्ष असते. त्यादृष्टीने प्रशासन आतापासूनच तयारीला लागले आहे.

डॉ. गेडाम महापालिकेचे आयुक्त असताना त्यांनी सिंहस्थ कुंभमेळा कामाचे नियोजन केले होते. कामातील नीटनेटकेपणा व गुणवत्तापूर्ण कामे ही त्यांच्या कामाची वैशिष्ट्ये होती. त्यामुळे सिंहस्थाचे काम योग्य पद्धतीने झाले. साधू-महंतांना विश्वासात घेऊन त्यांनी यशस्वीरीत्या सिंहस्थ कुंभमेळा पार पाडला.

२०१५ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याचा अनुभव असलेले डॉ. गेडाम यांची विभागीय आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. केंद्राच्या महत्त्वाकांक्षी आयुष्मान भारत योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली.

तेथेही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. त्यानंतर त्यांनी परदेशात जाऊन हार्वर्ड विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी संपादन केली. वर्षभरापासून त्यांच्याकडे कृषी आयुक्तपदाचा कार्यभार होता. नोव्हेंबर २०२३ मध्ये नाशिक जिल्ह्यात विशेषतः निफाड तालुक्यात झालेल्या गारपिटीमुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी ते नाशिकमध्ये आले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT