Latur News : निलंगा, जि. लातूर : ‘ओंकार साखर’ने लीजवर घेतलेल्या अंबुलगा येथील डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कारखान्याच्या तिसऱ्या गळीत हंगामाचा प्रारंभ रविवारी (ता. दहा) करण्यात आला. दरम्यान, कारखान्याला ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना जिल्ह्यात उच्चांकी दर देण्याची घोषणा कारखान्याचे चेअरमन बाबूराव बोत्रे पाटील यांनी केली.
यानिमित्त ११ कुमारिकांच्या हस्ते मोळीचे पूजन झाले. अध्यक्षस्थानी माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर होत्या. या वेळी आमदार संभाजी पाटील निलंगेकर व रेखा बोत्रे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. अनेक वर्षे बंद असणारा हा साखर कारखाना आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या प्रयत्नांतून बाबूराव बोत्रे पाटील यांनी सुरू केला.
सलग दोन वर्षे कारखाना यशस्वीपणे चालविल्यानंतर आता तिसऱ्या गळीत हंगामाचा प्रारंभ होत आहे. कारखाना सुरू झाल्यामुळे निलंगा तालुका व परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारखान्याकडून शेतकऱ्यांना वेळचे वेळी ऊस बिले अदा केली जात असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
आमदार संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले, की तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण सदैव कटिबद्ध आहोत. दोन वर्षे कारखान्याने वेळेत उसाची बिले अदा केली. पूर्ण क्षमतेने कारखाना कार्यान्वित करण्यात आला आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.