Horticulture Hero Agrowon
ॲग्रो विशेष

Horticulture Hero: डॉ. कैलास मोते यांची कारकीर्द दिशादर्शक

Dr.Kailas Mote: फलोत्पादन क्षेत्रात अग्रेसर ठरलेल्या महाराष्ट्राची वाटचाल अधिक भक्कम करण्यात फलोत्पादन संचालक म्हणून डॉ. कैलास मोते यांची कारकिर्द दिशादर्शक ठरली, अशी भावना कृषी आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनी निरोप समारंभात व्यक्त केली.

Team Agrowon

Pune News: फलोत्पादन क्षेत्रात अग्रेसर ठरलेल्या महाराष्ट्राची वाटचाल अधिक भक्कम करण्यात फलोत्पादन संचालक म्हणून डॉ. कैलास मोते यांची कारकिर्द दिशादर्शक ठरली, अशी भावना कृषी आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनी निरोप समारंभात व्यक्त केली. कृषी विभागात तीन दशके सेवा बजावून डॉ.

मोते काही दिवसांपूर्वी निवृत्त झाले. त्या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रक्रिया व नियोजन संचालक विनयकुमार आवटे होते. या वेळी विस्तार व प्रशिक्षण संचालक रफीक नाईवडी, निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक सुनील बोरकर, माजी संचालक दिलीप झेडे, आस्थापना सहसंचालक गणेश घोरपडे तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.

डॉ. मोते यांच्या कारकिर्दीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत २०२२ ते २५ दरम्यान राज्यातील फळबागांची लागवड दोन लाख हेक्टरने वाढली. ही वाढ इतर कोणत्याही राज्यापेक्षा सर्वाधिक होती. याशिवाय, त्यांनी फलोत्पादनात २१ पिकांना भौगोलिक मानांकन मिळवून देत देशात विक्रम केल्याचा उल्लेख या कार्यक्रमात करण्यात आला.

या वेळी डॉ. मोते म्हणाले, की केवळ योजनांची अंमलबजावणी हे उद्दिष्ट न ठेवता शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान कसे येईल, यासाठी प्रयत्न केले. देशाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेत फलोत्पादन विभागाने अव्वल कामगिरी केली.

२०२२-२३ मध्ये केंद्र शासनाच्या नव्या वित्तीय पद्धतीतून सर्वाधिक निधी महाराष्ट्राला मिळाला. ही कामगिरी २०२५-२६ मध्येही राज्याने कायम ठेवल्याचे समाधान आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar Water Crisis: अहिल्यानगर जिल्ह्यात टँकरची संख्या १०७ वर

Irrigation Project Benefits: टेंभू, म्हैसाळमुळे २३०० हेक्टर क्षेत्र झाले हिरवेगार

Tur Cultivation: खानदेशात तूर लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल; क्षेत्रवाढीची शक्यता

Rural Regional Development: सोलापूर जिल्ह्यात आणखी एक आकांक्षित तालुका

Land Acquisition Protest: रिंग रोड भूसंपादनासंदर्भात शेतकऱ्यांचा संताप

SCROLL FOR NEXT