Rice Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Rice Plantation : दुबार हंगामात भातलावणीची लगबग

Team Agrowon

Mumbai News : रसायनी-पाताळगंगा परिसरात दुबार हंगामातील भात लावणीच्या कामांची लगबग सुरू झाली आहेत. खरिपाच्या हंगामापेक्षा दुबार हंगामात पीक चांगले येत असल्‍याने सध्या शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे.

पाताळगंगा नदीच्या काठच्या गावातील शेतकऱ्यांना मुबलक पाणी उपलब्‍ध होत आहे. तसेच जांभिवली गावाजवळ माणिकगडाच्या पायथ्याशी असलेल्या बामणोली धरणाचे पाणीही सिंचनासाठी सोडण्यात येत असल्‍याने दुबार हंगामातील लागवडीखालील क्षेत्र वाढले आहे.

जांभिवली पंचक्रोशीत तसेच मोहोपाडा येथील शेतकऱ्यांना एमआयडीसीच्या जलशुद्धीकरण केंद्रातून सोडण्यात येणार्‌या सांडपाण्याचा आधार आहे. शेतकरी दुबार हंगामातील भात आणि भाजीपाल्याचे पीक घेत आहे. तर काहींनी कडधान्याची लागवड केली आहे. परिसरात दोन-तीन दिवसांपासून लावणीची काम सुरू झाली आहे.

बियाणे पेरणीनंतर रोपांच्या वाढीसाठी थंडीचे अनुकूल वातावरण असल्‍याने रोपांची वाढ चांगली झाली आहे. लावणीसाठी सध्या पोषक वातावरण आहे. यंदाच्या हंगामात बहुतेकांनी संकरित वाणांची पेरणी केली आहे. खरिपाप्रमाणे रब्‍बी हंगामातही चांगले उत्‍पादन मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. दहा पंधरा दिवसांत लावणीची काम पूर्ण होतील, असा अंदाज व्यक्‍त होत आहे.

शेवग्‍याच्या शेंगांना मागणी

वासांबे-मोहोपाडा येथील बाजारपेठेत स्थानिक शेतकऱ्यांच्या शेवग्‍याच्या शेंगा विक्रीसाठी आल्‍या आहेत. ग्राहकांकडूनही शेंगाची आवर्जून खरेदी करण्यात येत आहे. रसायनी परिसरातील शेतात, अनेकांच्या अंगणात शेवग्यांची झाडे आहेत. आदिवासीवाडीतही शेवग्‍याची झाडे मोठ्या प्रमाणात असून त्‍यांच्या विक्रीतूनच आदिवासींचा उदरनिर्वाह चालतो. शेवग्‍याचा हंगाम बाराही महिने असून तीन ते चार शेंगांची एक जुडी २० ते २५ रुपयांना विकली जात असल्‍याचे विक्रेत्‍या महिलेने सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT