Mallikarjun Kharge Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Election : ३७० कलमाबाबत नको, शेतकरी आत्महत्या, हमीभावावर बोला

Farmers Issue : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक प्रचारातही शहा ३७० कलमाबाबत बोलत आहेत. त्यांनी ते जम्मूत जाऊन बोलावे. महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या, पिकांना हमीभाव या विषयांवर बोलावे, असा टोला त्यांनी या वेळी लगावला.

Team Agrowon

Nashik News : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक प्रचारातही शहा ३७० कलमाबाबत बोलत आहेत. त्यांनी ते जम्मूत जाऊन बोलावे. महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या, पिकांना हमीभाव या विषयांवर बोलावे, असा टोला त्यांनी या वेळी लगावला. भाजपने ‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा कोठून आणला, हे कळत नाही.

बाटनेवाला आणि काटनेवाला भाजपच असल्याचा आरोप अखिल भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीयअध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. तर काँग्रेसने नेहमीच देशवासीयांना एकसंघ ठेवण्याचे काम केल्याचे सांगितले.

महाविकास आघाडीतील इगतपुरी त्र्यंबकेश्‍वर मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार लकी जाधव यांच्या प्रचारार्थ गुरुवारी (ता. १४) त्र्यंबकेश्‍वर येथील जव्हार फाटा येथे आयोजित सभेत खर्गे बोलत होते. या वेळी अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटी सदस्य खासदार नासीर हुसेन, प्रणित झा, खासदार डॉ. शोभा बच्छाव, प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शरद आहेर, प्रदेश सचिव राहुल दिवे, शहराध्यक्ष आकाश छाजेड, युवकचे जिल्हाध्यक्ष गौरव पानगव्हाणे, प्रा. ज्ञानेश्‍वर गायकवाड, रमेश कहांडोळे, स्वाती जाधव, वंदना पाटील, जयेश पोकळे आदी उपस्थित होते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी इंदिराजी आल्या, तरी कलम ३७० येणे अशक्य असल्याच्या केलेल्या वक्तव्याचा खर्गे यांनी चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, की ‘बटेंगे तो कटेंगे’ असे सांगत ते लोकांकडे मते मागत आहेत. खरेतर बाटनेवाले आणि काटनेवाले भाजपच आहे. आम्ही तर वाचविणारे आहोत. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी देशासाठी बलिदान दिलेले आहे. ईडी, सीबीआय सारख्या यंत्रणांचा वापर करून घाबरविण्याचा भाजपचा उद्योग सुरू आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्‍वरला भाविक येत असतात. मात्र भाजपने आताच महाराष्ट्रात निवडणूक प्रचारासाठी मोठी फौज उतरवली आहे. केंद्रात काम करायचे सोडून पंतप्रधान मोदी, अमित शहा महाराष्ट्रात फिरत आहेत. महापालिका, जिल्हा परिषद निवडणूक प्रचारातही ते दिसतील, यातच भाजपचा पराभव असल्याचे त्यांनी सांगितले.

खोटे बोलून फसविणे हा मोदीजी आणि शहा यांचा उद्योग आहे. काळे धन देशात परत आणून ते प्रत्येक भारतीयाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये देणार होते, ते मिळाले नाहीत. दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्माण करू, अशी घोषणा केली. परंतु तेवढा रोजगारही निर्माण केला नाही. पिकांना हमीभावाचे आश्‍वासनही खोटे ठरल्याचे सांगत भाजपवर टीका केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fruit Crop Insurance : फळपीक विमा प्रश्न सुटता सुटेना

Rabi Season 2024 : खानदेशात पेरण्यांना आली गती

Cotton Procurement : बार्शीटाकळीमध्ये कापूस खरेदी बंदचा निर्णय मागे

Agriculture Irrigation : घुंगशी प्रकल्पावरून सिंचनासाठी जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा

Solapur APMC : सोलापूर बाजार समितीतील १० अडत व्यापाऱ्यांचे परवाने रद्द

SCROLL FOR NEXT